जानवे येथील पोलिसाला शेतीच्या वादातून मारहाण; गुन्हा दाखल

अमळनेर: शेताच्या वादावरून पोलिसाला सख्खाभाऊ आणि पुतण्याने मारहाण केल्याची पटना ३० रोजी सकाळी ११ वाजता जानवे येथे घडली.
मुंबई पोलिस्वात कार्यरत असलेले गुरुदास अर्जुन पाटील (वय ५२) रा. जानये हे ३० रोजी त्यांच्या वडिलोपार्जित शेतीत रोटा मारण्यासाठी ट्रॅक्टर घेऊन गेले असता त्यांचा भाऊ ट्रॅक्टर पुढे येऊन शिवीगाळ लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले.
पुतण्या कल्पेश चंद्रकांत पाटील याने देखील पकडून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यावेळी आजूबाजूच्या ग्रामस्थांनी भांडण आवरले. तेव्हा चंद्रकांत पाटील याने जीवे मारण्याची धमकी दिली. रुग्णालयातून उपचार घेऊन आल्यावर गुरुदास पाटील यांनी अमळनेर पोलीस स्टेशनला फिर्याद दिल्यावरून चंद्रकांत पाटील व कल्पेश यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता ११८(१), ११५, २५२, ३५१ (२), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हेडकॉन्स्टेबल कैलास शिंदे करत आहेत.