महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगावची सांस्कृतिक भूमी टिकून रहायला हवा. मला नाटक फार जमत नव्हते, नृत्य थोडेफार जमायचे मात्र आता ते देखील जमत नाही. आता फक्त राजकीय गोष्टी जमतात. काळानुसार सर्व बदलते. पडद्यामागे काही लोक असतात तसेच आमदार महोत्सवामागे आ.राजूमामा भोळे यांचा मुलगा विशाल याची भूमिका महत्त्वाची आहे. मामा सर्वांचे मामाच आहे. मामाचे काम हट्ट पुरवण्याचे असते आणि ते हट्ट पुरवण्यास कधीही मागे पुढे पाहत नाही. भविष्यात देखील आपण सर्वांनी आ.राजुमामा भोळे यांच्या पाठीशी उभे राहावे, असे आवाहन खा.स्मिता वाघ यांनी केले.
आमदार सुरेश दामू भोळे (राजूमामा) आयोजित आपल्या जळगाव शहराचा सांस्कृतिक उत्सव आमदार सांस्कृतिक महोत्सव २०२४ चा समारोप दि.२५ ऑगस्ट रोजी झाला. प्रसंगी व्यासपीठावर खा.स्मिता वाघ, आ.राजुमामा भोळे, हास्य जत्रा फेम कलाकार प्रा.हेमंत पाटील, माजी महापौर सीमा भोळे, जितेंद्र मराठे, विशाल त्रिपाठी, राहुल वाघ, डॉ.केतकी पाटील, गायत्री राणे, निला चौधरी, दीप्ती चिरमाडे, माजी कृषी अधिकारी अनिल भोकरे आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते. महोत्सवातील सर्वांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
प्रास्ताविक करताना भरारी फाउंडेशनचे अध्यक्ष दीपक परदेशी म्हणाले की, आमदार महोत्सवाचे नियोजन अवघ्या ८ दिवसात झाले आणि त्यात १६ प्रकारच्या कला, ढोल पथकाचे सादरीकरण झाले. अंदाजे ९ हजार स्पर्धक आणि ६ हजार प्रेक्षक असे अंदाजे १५ हजार लोकांनी याचा लाभ घेतला. शहराचे सांस्कृतिक वैभव टिकले तर शहर टिकून राहते, असे प्रतिपादन त्यांनी केले. सूत्रसंचालन विनोद ढगे यांनी केले.
दरवर्षी भरणार आमदार सांस्कृतिक महोत्सव
कलाकार प्रा.हेमंत पाटील म्हणाले, सांस्कृतिक महोत्सव गरजेचे आहे. मामा म्हणजे दोन माँ (आई). आपल्यावर मायेच्या ममतेने राजुमामांनी प्रेम केले. मामांनी केलेला महोत्सव दरवर्षी होणार असल्याचे आ.राजुमामा भोळे यांनी घ्यावा अशी विनंती प्रा.हेमंत पाटील यांनी केली असता आ.भोळे यांनी ते लागलीच जाहीर केले. प्रा.पाटील यांनी सर्वांना शुभेच्छा देत दरवर्षी या पर्वणीचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांमधील कलागुणांना पालकांनी वाव द्यावा : आ.राजुमामा भोळे
आ.राजूमामा भोळे म्हणाले की, सध्याच्या युगात गुणांची स्पर्धा लागली आहे. पालकांनी विद्यार्थ्यांमधील गुण कला ओळखून त्याला वाव द्यायला हवा. नेहमी सांस्कृतिक महोत्सवात सहभागी होऊन त्याचा लाभ घ्यावा. स्पर्धेत विजय पराजय होत असतो मात्र स्पर्धेत भाग घेणे आवश्यक असते. कारण एकाच्या सहभागाशिवाय दुसरा स्पर्धेक विजयी होऊ शकत नाही. खान्देशचे वैभव फार मोठे आहे. बहिणाबाई चौधरी, शून्याची जगाला ओळख देणारे भास्कराचार्य हे जळगावाचे आहेत, असे आ.भोळे यांनी सांगितले.