अभयारण्या लगतच्या शेतकऱ्याचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान; वन्यप्राण्यांचा उपद्रव्य वाढला..!

अभयारण्या लगतच्या शेतकऱ्याचे वन्यप्राण्यांमुळे नुकसान; वन्यप्राण्यांचा उपद्रव्य वाढला..!
महापोलीस न्युज सुभाष धाडे| मुक्ताईनगर वाघ्र्य अधिवास क्षेत्र म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील ‘मुक्ताई-भवानी अभयारण्या’लगतच्या शेती-शिवारात वन्यप्राण्यांनी हौदोस घातला असुन रात्री रानडुक्करे व हरीण आणि सांबरांचे कळप शेतात येऊन शेतीपिकांचे अतोनात नुकसान करीत आहे.सद्या या प्रकारात वाढ झाली असुन वनविभागाकडे नुकसान भरपाई साठी शेतकरी वर्गाकडून ऑनलाईन अर्ज प्राप्त होत आहे. मात्र पिकांचे झालेले नुकसान व वनविभागाकडुन मिळणारी भरपाई यामध्ये खुप मोठी तफावत असुन याप्रकरणी लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांकडुन होत आहे.
मुक्ताई-भवानी अभयारण्यात वाघ बिबट्या या हिस्र पशुसह इतर सर्वच तक्षणभक्षक प्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर असुन तृणभक्षक प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. याशिवाय अवैध वनचराई व पारंपारिक कुरणे नष्ट होऊन जंगल परीसरात तरोटा व रानतुळस अशा विविध प्रकारची वन्यप्राण्यांना खाण्यायोग्य नसलेली कुरणे उगवत असल्याने वन्यप्राणी शेती-शिवारांकडे धाव घेत आहे.
यामुळे शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असुन शेतकरी वर्ग पुरता वैतागलेला दिसुन येत आहे. आधीच वेळोवेळी येणाऱ्या नैसर्गिक आपत्ती सीएमव्ही व्हायरस आणि यातच भर म्हणुन वन्यप्राण्यांकडुन होणारे अतोनात नुकसान. वनविभागाकडुन मिळणारी नुकसानभरपाई आणि प्रत्क्ष झालेले नुकसान यामध्ये खुप मोठी तफावत आढळुन येते.याशिवाय वर्षभरात वेळोवेळी नुकसान होत असते व वर्षभरात भरपाईसाठी एकदाच अर्ज करता येत असल्याने शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त होतांना दिसुन येते.
सौर ऊर्जा कुंपनाचा काही प्रमाणात होऊ शकतो फायदा
परीसरातील वन हद्दीलगतच्या काही शेतकऱ्यांनी वनविभागाकडे सौर कुंपनसाठी मागणी अर्ज ही केले होते. तत्कालीन उपवनसरंक्षक जळगांव यांनी याबाबत दखल घेत सौर ऊर्जेवरील झटका मशीन मंजुर करीत ठाणे येथील ठेकेदाराला ठेका दिला गेला.पण मात्र सौर यंत्र एरंडोल परीसरात वाटप करण्यात आले.यानंतर सदर क्षेत्रात सौर कुंपण साठी काही लाखांचा निधी मिळाला खरा परंतु वाटप न करता आल्यामुळे वर्षाअखेरीस परत गेल्याची चर्चा होती.
वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी सौर कुपंन (झटका मशीन) चा काही प्रमाणात फायदा होऊ शकतो. यावर तात्पुरती उपाययोजना म्हणुन वनहद्दीलगतच्या इच्छुक शेतकऱ्यांना विनाअट सौर कुंपण वाटप कराव्यात अशी मागणी परीसरातुन होत आहे.
मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी,दुई,डोलारखेडा,नांदवेल,वायला,टाकळी,महालखेडा,निमखेडी बु ,चारठाणा,मोरझिरा,कुऱ्हा-काकोडा,थेरोडा,कोऱ्हाळा, वडोदा यासह मुक्ताईनगर वनक्षेत्रार्तगत रूईखेडा वनपरीमंडळातील माळेगाव, हरताळा,पिप्री आकाराऊत,सातोड आदी भागात तृणभक्षक वन्यप्राणी सांबर,नीलगाय,हरीण, रानडुकरे याकडुन शेतीपिक नुकसानीचे प्रमाण मोठे आहे..
सुकळी शिवारात केळी उत्पादक शेतकरी भाऊराव पाटील,शिवाजी पाटील आदी शेतकऱ्यांचे केळी खोडांचे नुकतेच नुकसान रानडुकारांकडुन करण्यात आले.






