अयोध्यानगर येथील श्री हनुमान महाआरतीला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद !
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आयोजन

अयोध्यानगर येथील श्री हनुमान महाआरतीला भाविकांचा उस्फुर्त प्रतिसाद !
महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांचे आयोजन
जळगाव I प्रतिनिधी शहरातील अयोध्या नगर भागातील श्री हनुमान मंदीरात १२ जानेवारीला रात्री ७ वाजता समस्त सनातनी हिंदूंच्या वतीने सामूहिक श्री हनुमान चालीसा आणि महाआरती करण्यात आली.
या वेळी परिसरातील लोकप्रतिनिधी, युवा कार्यकर्ते, महिला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहून मोठ्या भक्ती भावाने महाआरती केली. स्वामीनारायण मंदिराचेनयन स्वामी यांचीही उपस्थिती होती . या महाआरतीला शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या वेळी प्रसाद म्हणून शिरा, चहा वाटण्यात आला. .
पुढील महाआरती २ फेब्रुवारीला छत्रपती शिवाजी नगर येथे !
शहरातील विविध भागांतील सनातनी हिंदूंचे संघटन व्हावे आणि राम राज्य अर्थात हिंदू राष्ट्र स्थापनेसाठी कृपा प्राप्त करण्यासाठी हिंदूंकडून सामूहिक उपासना घडावी, या उद्देशाने महाराष्ट्र मंदिर महासंघ आणि हिंदू जनजागृती समितीच्या वतीने शहरात प्रत्येक महिन्यातील पहिल्या रविवारी असे महा आरतीचे आयोजन करण्यात येणार असून पुढील महाआरती रविवार, २ फेब्रुवारी या दिवशी सायं ६ वाजता छ. शिवाजी नगर मधील श्री मारुती मंदिरात होणार आहे. त्याला अधिकाधिक हिंदू बांधवानी उपस्थित राहावे असे आवाहन महाआरती समितीच्या वतीने सर्वश्री गजानन तांबट, आशिष गांगवे, नीलकंठ चौधरी, संजय दीक्षित, संजय येवले, जयेश कुलकर्णी, अनिल चौधरी यांनी केले.






