
पहेलगाम हल्ल्यातील मृत नागरिकांना कॅंडल मोर्चातून श्रद्धांजली
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)तर्फे तीव्र निषेध
जळगाव प्रतिनिधी ;- जम्मू-काश्मीरमधील पहेलगाम येथे पर्यटनासाठी गेलेल्या २८ निष्पाप नागरिकांवर देशविरोधी विचारसरणीने ग्रासलेल्या अतिरेक्यांनी बेछूट गोळीबार करत भ्याड हल्ला केला. या अमानवी कृत्याचा तीव्र निषेध करत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या वतीने बुधवारी (२३ एप्रिल) सायंकाळी ७ वाजता कॅंडल मार्च काढण्यात आला.
या श्रद्धांजली कार्यक्रमात हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना आदरांजली अर्पण करत उपस्थितांनी दोन मिनिटांचे मौन पाळून त्यांच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी प्रार्थना केली.
कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद गट) चे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. यामध्ये जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, महानगर जिल्हाध्यक्ष ईजाज मलिक, समन्वयक विकास पवार, जिल्हा सरचिटणीस वाय.एस. महाजन, माजी जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी, कार्याध्यक्ष डॉ. संग्रामसिंह सूर्यवंशी, सचिन पाटील, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष अशोक पाटील, युवक महानगर अध्यक्ष रिंकू चौधरी, मिनाक्षी चौव्हाण, रमेश पाटील, माजी नगरसेवक राजू मोरे, सुनील माळी, डॉ. रिजवान खाटीक, रमेश बारे, इब्राहीम तडवी, नामदेव वाघ, एस.डी. पाटील, रहीम तडवी, गौरव वाणी, विशाल देशमुख, रियाज कांकर, मतिन सैय्यद, चेतन पवार, आकाश हिवाळे, नईम खाटीक, राजू बाविस्कर, डॉ. चित्रसेन भारद्वाज, सतीश चौव्हाण, फराण शेख, सैय्यद फैजान, सैय्यद मोबीन, सैय्यद उमर, माज मलिक, सोहेल मलिक, कैफ शेख, संजय जाधव आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी उपस्थितांनी या दहशतवादी कृत्याचा निषेध करत केंद्र सरकारकडून कठोर पावले उचलावीत आणि अशा हल्ल्यांमागे असलेल्या अतिरेक्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणीही केली.