Social

निळे निशाण सामाजिक संघटनेच्या आंदोलनाला पाचव्या दिवशी यश!

महा पोलीस न्यूज | २ मार्च २०२४ | रावेर येथील रावेर ग्रामीण रुग्णालयचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक डॉ.एन. डी.महाजन यांच्या मनमानी कारभार विरोधात निषेधार्थ निळे निशाण सामाजिक संघटनेच्यावतीने पाच दिवसापासुन सुरु असलेल्या ठिय्या व आमरण उपोषण आंदोलनची आज सांगता करण्यात आली.

रावेर तालुक्यातील गोरगरीब गरजू रुग्णांना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होत नसल्याचे सांगत दि.२८ फेब्रुवारीपासून सुरु असलेले ठिय्या आंदोलनचे रूपांतर आमरण उपोषणात करण्यात आले होते. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आनंद बावीस्कर यांनी स्वतः आमरण उपोषणाचा निर्णय घेऊन जनहिताच्या आरोग्याच्या संबंधी मागण्या लावून धरल्या होत्या. दरम्यान, आनंद बावीस्कर यांची प्रकृती खालावल्याने आरोग्य विभाग व महसूल प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन संघटनेच्या जवळपास सर्व मागण्या मान्य केल्यानंतर नायब तहसिलदार संजय तायडे व नूतन वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वप्नील कळसकर यांच्या हस्ते शीत पेय देऊन उपोषण सोडविण्यात आले.

जिल्हा शलयचिकित्सक जळगाव यांनी उपोषणार्थी यांच्या मागण्या मान्य असल्याचे पत्र दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी नायब तहसिलदार संजय तायडे, वैद्यकीय अधीक्षक डॉ.स्वप्नील कळसकर, वैद्यकीय अधिकारी शुभांगी चौधरी तसेच संघटनेचे पदाधिकारी जिल्हा महिला प्रमुख चारुलता सोनवणे, सदाशिव निकम, नंदा भावटे, वैशाली हेरोळे, अशोक तायडे, सुधीर सैगमिरे, विलास तायडे, अनिल इंधाटे, लक्ष्मी मेढे, घुमा तायडे, सावन मेढे, गोकुळ करवले, इम्रान खान, विजय धनगर, चंद्रकांत सोनवणे, विक्की जाधव, धनराज घेटे, आकाश निकम, संकीत तायडे, उदय वाघ, राकेश तायडे, मनोज लाहासे, विलास अटकाळे, चंबाबाई अवसरलमल, जोस्ना सन्यास, नम्रता हिवरे, अलका जाधव, कविता महाले, वत्सला करवले, रेखा तायडे, शेकडो पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button