चार महिन्यांच्या थकीत वेतनासह फरक मिळण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचाऱ्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव प्रतिनिधी ;- चार महिन्यांच्या थकीत वेतनासह फरक मिळावा या मागणीसाठी महापारेषणच्या कंत्राटी कर्मचाऱ्याने जिल्हाधिकारी आणि कामगार कार्यालय यांना पाठविण्यात आलेल्या निवेदनात केला आहे.
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी या शासकीय कंपनीत अवध बिजनेस सर्विसेस आय प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली ब्रांच खडका तालुका भुसावळ या एजन्सी मार्फत कंत्राटी कर्मचारी असलेले खेडी रोड ,जळगाव येथील रहिवासी कोमल शरद तळले यांचे गेल्या चार महिन्यांपासून ठेकेदाराने वेतन दिलेले नसून त्यांचे एक वर्षाच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देखील त्यांना मिळाली नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद आणि कामगार आयुक्त जळगाव यांना थकीत वेतन आणि फरकाची रक्कम सह दिवाळी बोनसची रक्कम मिळावी या मागणीसाठी निवेदन दिले आहे. निवेदनात कोमल तळले यांनी म्हटले आहे की , मे, जून, जुलै आणि ऑगस्ट 2025 या चार महिन्याचे वेतनसह पीएफ आणि esic रक्कम
एक वर्षापासून अदा करीत नसून मी कर्मचारी या नात्याने माझ्यावर उपासमारीची वेळ निर्माण झाली आहे. तसेच दिवाळी बोनस हा अंदाजे 15 ते 20 हजार पर्यंत देण्याचा आदेश ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजूर केलेला असतानाही सदर ठेकेदाराने नगदी स्वरूपात केवळ 6000 रुपये बोनस दिला होता. . याशिवाय ठेकेदाराने व्हाउचर स्लीप वर कर्मचाऱ्यांच्या सह्या दबाव तंत्र वापरून केल्याचा आरोप या निवेदनात तळेले यांनी केला आहे.
आम्ही कंत्राटी कर्मचाऱ्यांनी फोन द्वारे स्पष्ट करून पगाराबाबत विचारणा केली असता टाळाटाळची उत्तरे किंवा फक्त मौखिक आश्वासन देऊन गेल्या चार महिन्यांपासून करीत असल्याचे म्हटले आहे. . जिल्हाधिकारी यांनी अवध बिजनेस सर्विसेस आय प्रायव्हेट लिमिटेड डोंबिवली यांचे मालक आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील न्याय मिळावा अशी अपेक्षा कोमल तलेले तळलेले यांनी केली आहे. जीवनाशक गरजा भागविण्यासाठी कर्ज घेतले असून त्याचे हप्ते देखील थकले आहेत त्यामुळे मी मानसिक तणावात असून मला न्याय मिळावा अशी अपेक्षा त्यांनी निवेदनाद्वारे व्यक्त केली आहे.






