Social

पहुरमध्ये थरार! हिरा मारुतीच्या मूर्ती स्थलांतरावेळी वानर सेनेचे आगमन ; हनुमानाचा अनोखा चमत्कार? (पहा व्हिडीओ )

स्थलांतरावेळी अचानक वानर सेनेचा वेढा! हनुमानाची कृपा की अनपेक्षित योगायोग?

पहुर (ता. जामनेर) येथे भव्य श्रीराम मंदिर उभारणीसाठी अनेक दिवसांपासून तयारी सुरू होती. मात्र, मंदिराच्या नव्या आराखड्यात २० फूट उंच हिरा मारुतीची मूर्ती अडथळा ठरत असल्याने, तिला स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून मूर्ती हलवण्याचे प्रयत्न सुरू होते.

स्थलांतर सुरू होताच वानरांचा मोठा गट!

अखेर, सर्व अडचणींवर मात करून मूर्ती स्थलांतराचा अंतिम टप्पा सुरू झाला. मात्र, त्याच क्षणी अचानक वानरांची मोठी सेना मंदिर परिसरात धावून आली! या अनपेक्षित घटनेने संपूर्ण गावात खळबळ माजली!

गिरीश महाजन यांचे सहकार्य

श्रीराम मंदिराच्या नव्या उभारणीसाठी मंदिर समितीने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरु होते . मंदिराचे अध्यक्ष अरविंद देशमुख यांनी राज्याचे मंत्री गिरीशभाऊ महाजन यांच्या सहकार्याने भरीव आर्थिक मदत मिळवली. त्यांच्या प्रयत्नांमुळे मंदिर उभारणीसाठी आवश्यक निधी उपलब्ध झाला. मात्र, मूर्तीच्या जागेमुळे आराखड्यात अडथळा निर्माण झाल्याने तिचे स्थलांतर अपरिहार्य होते.

भक्तांमध्ये भक्तीचा ज्वर; “हनुमान स्वतः प्रकट झाले?”

जेव्हा मूर्ती हलवण्याचे काम सुरू होते, तेव्हा अचानक वानरांचा मोठा गट मंदिराभोवती गोळा झाला. काही वानर थेट मूर्तीच्या दिशेने झेपावत होते, तर काही स्थलांतराच्या कामात गुंतलेल्या कार्यकर्त्यांभोवती घुटमळत होते. हे दृश्य पाहून उपस्थित भाविक स्तब्ध झाले!

गावकऱ्यांनी त्वरित या घटनेला हनुमानाची कृपा मानले आणि मंत्रोच्चार, आरती, पूजन सुरू केले. काहींनी वानरांना फळे अर्पण केली, काहींनी जय हनुमानच्या गजरात मूर्ती स्थलांतराचे काम सुरू ठेवले.

अखेर काही वेळानंतर वानर स्वतःहून मंदिर परिसरातून निघून गेले, आणि मूर्तीचे स्थलांतर यशस्वीरीत्या पूर्ण झाले. या अद्भुत घटनेनंतर पहुरमध्ये एक अनोखी भक्तीमय ऊर्जा निर्माण झाली आहे.

श्रीराम मंदिर ; नव्या पर्वाची सुरुवात!

गिरीश महाजन आणि अरविंद देशमुख यांच्या पुढाकाराने श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे. भविष्यात हे मंदिर भक्तांसाठी एक महत्त्वाचे धार्मिक केंद्र ठरेल आणि पर्यटनस्थळ म्हणूनही नावारूपास येईल.

यावेळी श्रीराम मंदिर ट्रस्टचे माजी अध्यक्ष भाऊराव बारकू पाटील, राजधर भाऊ पांढरे, मंडळाचे उपाध्यक्ष शैलेश पाटील, सचिव भारत पाटील, किशोर महाराज लोहार, अमोल कुमावत,गणेश कुमावत,सचिन कुमावत,अनुप पांढरे, रवींद्र पांढरे, संदीप सोनवणे, गणेश पाटील,कैलास बापू चव्हाण, सुरेश पाटील,नीलकंठ पाटील,किरण खैरनार, अमोल पांढरे,पांडुरंग पाटील,पांडुरंग गोयर, अनिल मोरे, मनोज होळकर, ईश्वर बारी, विजय जाधव,उपस्थित होते.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button