पंढरपूर जाण्यासाठी जळगाव स्थानकावर रेल्वेना थांबा देण्याची मागणी
जळगाव ;-जळगाव पंढरपूर ते जाण्यासाठी भरपूर वारकरी आहेत परंतु मैसूर,हुबली एक्सप्रेस या गाड्यांना जळगाव येथे थांबा नाही नसल्याने त्यामुळे त्यांना भुसावळ येथे जाऊन कुर्डूवाडी- पंढरपूरसाठी जावे लागते या गाड्यांना जळगाव येथे थांबा दिल्या तर जळगावतील बऱ्याच वारकऱ्यांचा/प्रवाशांचा आनंद दुगुणीत होईल.
छत्रपती शिवाजीनगर बाजूने असलेले जळगाव महानगरपालिका हद्दीतील रेल्वे सिमेंटची स्लीपर हे लवकरात लवकर काढून घ्यावे कारण ते रात्र सात वाजता दारू पिणारे,गांजा फुगणारे व शिव्या देणार लोक त्यावर बसलेले असतात म्हणजे महिलांना,मुलांना गच्चीवर जाऊन सुद्धा त्या ठिकाणी उभा नाही असे रिकामी कामे करत बसलेली असतात छत्रपती शिवाजीनगरच्या बाजूने रेल्वेचे काम तिकीट बुकिंग ऑफिस,आरपीफ/जीआरपी ऑफिस आपण लवकरात लवकर पूर्ण करून द्यावे की तिथली गुन्हेगारी थांबण्यास शक्य होईल.अशी विनंती माननीय स्टेशन मॅनेजर जळगाव रेल्वे स्टेशन यांना करण्यात आलेली आहे व तसेच रवाना डीआरएम ऑफिस भुसावळ मंडळ यांना केलेली आहे. त्यावेळेस स्टेशन मॅनेजरला निवेदितांना डी आर यु सी मेंबर व धर्मराज फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष विनायक पाटील,किरण कोळी, गणेश मोजर,कैलास शिंदे,भूषण सांगोरे, गोकुळ चव्हाण,किरण ठाकूर हे उपस्थित होते..