Health

पीसीपीएनडीटी जिल्हा सल्लागार समितीची पुनर्रचना; जळगाव जिल्ह्यासाठी नव्या सदस्यांची नियुक्ती

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाचा आदेश; पवन जैन, मुकूंद गोसावी यांचा समावेश

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (PCPNDT) अधिनियम प्रभावीपणे राबविण्यासाठी जिल्हा सल्लागार समितीची पुनर्रचना करण्यात आली असून नव्या सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यासंदर्भातील आदेश जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. स्वप्नील बी. सांगळे यांनी ३ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे.

आदेशानुसार, पीसीपीएनडीटी कायद्याच्या कलम १७ (५) नुसार प्रत्येक जिल्ह्यासाठी सल्लागार समिती असणे आवश्यक आहे. त्यानुसार यापूर्वी अस्तित्वात असलेल्या समितीचे पुनर्गठन करून नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवीन जिल्हा सल्लागार समितीत डॉ. वसंत संजय भंगाळे – स्त्रीरोगतज्ज्ञ, डॉ. नम्रता एम. अच्छा – स्त्रीरोगतज्ज्ञ (शासकीय), डॉ. मिलिंद जयंत बारी – बालरोगतज्ज्ञ, डॉ. रविंद्र ठाकूर – जिल्हा शल्य चिकित्सक अधिकारी (शासकीय), ॲड. संभाजी आर. जाधव – विधी तज्ज्ञ, मुकुंद गोसावी – समाजसेवी कार्यकर्ते, पवन जैन – सामाजिक कार्यकर्ते, श्रीमती अलका बडगुजर – सामाजिक कार्यकर्त्या या सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे.

समितीची भूमिका
ही समिती पीसीपीएनडीटी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, सोनोग्राफी केंद्रांवर देखरेख, गर्भलिंग निदानास प्रतिबंध, तसेच संबंधित प्रकरणांमध्ये जिल्हा प्रशासनाला आवश्यक ते मार्गदर्शन व सल्ला देण्याचे कार्य करणार आहे. जिल्ह्यातील गर्भलिंग निवडीस प्रतिबंध घालण्यासाठी तसेच ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ या अभियानाला बळकटी देण्यासाठी या समितीची भूमिका महत्त्वाची मानली जाते.

आदेशात नमूद करण्यात आले आहे की, नियुक्त सदस्यांची निवड आजपासून तीन वर्षांच्या कालावधीसाठी राहील. मात्र, एखादा सदस्य कार्यक्षम नसल्याचे आढळल्यास किंवा त्याच्या पदाचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आल्यास जिल्हा शल्यचिकित्सकांना संबंधित सदस्याची नियुक्ती रद्द करण्याचा अधिकार राहणार आहे.

जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयाने जारी केलेल्या या आदेशामुळे पीसीपीएनडीटी कायद्याची जिल्ह्यात अधिक प्रभावी अंमलबजावणी होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button