प्रा. संभाजी जमधडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान

प्रा. संभाजी जमधडे यांना पीएच.डी. पदवी प्रदान
जळगाव : के.सी.ई. सोसायटी संचलित व्ही.पी. होले शिक्षणशास्त्र आणि शारीरिक शिक्षणशास्त्र (स्वायत्त) महाविद्यालय, जळगाव येथे कार्यरत प्रा. संभाजी भिमराव जमधडे यांना कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या अंतरविद्या शाखेअंतर्गत शिक्षणशास्त्र विषयात विद्यावाचस्पती (पीएच.डी.) पदवी प्रदान करण्यात आली.
त्यांनी “प्राथमिक स्तरावरील भूगोल विषयासाठी मिश्र अध्यापन पद्धतीच्या परिणामकारकतेचा अभ्यास” या विषयावर शिक्षणशास्त्र विभागाच्या विभागप्रमुख डॉ. मनिषा विनय इंदानी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन पूर्ण केले.
प्रा. जमधडे यांना विद्यावाचस्पती पदवीचे प्रमाणपत्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक डॉ. मनिषा विनय इंदानी व डॉ. पूनम भिमराव जमधडे उपस्थित होत्या.
पीएच.डी. पदवी मिळाल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक राणे व उपप्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी प्रा. जमधडे यांचे अभिनंदन केले.






