पिंप्राळ्यात ‘परिवर्तन मेळावा’ : शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । पिप्राळा परिसरातील हुडको येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने भव्य ‘परिवर्तन मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले. या मेळाव्याला परिसरातील कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध समाज घटकांतील शेकडो कार्यकर्त्यांनी विश्वासाने भाजपच्या विचारधारेचा स्वीकार करत पक्षप्रवेश केला.
मेळाव्यादरम्यान पक्षात नव्याने दाखल झालेल्या कार्यकर्त्यांचे आमदार राजु भोळे यांनी स्वागत केले. त्यांनी आपल्या भाषणात सांगितले की, “भाजप ही फक्त राजकीय संघटना नसून विकासाचे एक शक्तीस्थान आहे. समाजातील सर्व घटकांना न्याय देणारा आणि राष्ट्रहिताला प्राधान्य देणारा पक्ष म्हणून भाजपा कार्यरत आहे.” या परिवर्तन मेळाव्यामुळे पिप्राळा व परिसरातील राजकीय समीकरणात नवचैतन्य निर्माण झाले असून, भाजपची ताकद आणखी वाढली असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलताना जाकीर पठाण म्हणाले की, “सबका साथ, सबका विकास” या घोषवाक्यावर व भाजप संकटमोचक मंत्री गिरीश महाजन, आमदार राजुमामा भोळे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांनी पक्षप्रवेशाचा निर्णय घेतला आहे. सर्वांच्या साथीने आगामी काळात आपल्या भागात प्रचंड विकासकामे करून प्रभागाचा विकास करायचा माझा संकल्प आहे. भविष्यात सर्व लोक पिंप्राळा भागात येऊन बघतील असे आम्ही करणार असल्याचे ते म्हणाले.
या परिवर्तन मेळाव्यात मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, जिल्हाध्यक्ष दीपक सुर्यवंशी, अल्पसंख्याक आघाडी अध्यक्ष नूर शेख, महिला जिल्हा अध्यक्षा नितु परदेशी, माजी नगरसेवक सुरेश सोनवणे, मंडळ अध्यक्ष अतुल बारी, उपाध्यक्ष किरण भोई, वसीम खान, माजी नगरसेवक विजय पाटील, सागर पाटील, आशीष सपकाळे, चंद्रकांत कोळी, अनुराज मराठे, माधुरी देशमुख, शोभाताई कोळी, सरचिटणीस उमेश सूर्यवंशी, चिटणीस रवी पाटील, दीपक देसाई, बंटी बारी, बबलू बारी, शांताराम बारी, यशवंत भोई, शिवा भोई, विनोद आढळके व शुक्ला ताई यांची उपस्थिती होती.
शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश
या परिवर्तन मेळाव्यात हुडको ख्वाजा नगर येथील सामाजिक कार्यकर्ते अय्युब पठाण, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र कोळी, खंडेराव नगरातील भोई वाडा मित्र मंडळाचे विक्की भोई, नाना भोई, विकास भोई, राकेश भोई, समाधान भोई, यशवंत भोई, शिवदास भोई तसेच सुमारे शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. सार्वजनिक मित्र मंडळ खंडेराव नगरचे रविंद्र रूले आणि सुनिल भोई यांनी देखील यावेळी भाजपा प्रवेश केला.






