CrimeSocial

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार प्रकरण तापले; अभियंता योगेश अहिरेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

भाजपाचे मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

पीडब्ल्यूडी भ्रष्टाचार प्रकरण तापले; अभियंता योगेश अहिरेंसह वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चौकशीची मागणी

भाजपाचे मुविकोराज कोल्हे यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार; सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरण आता अधिकच गाजू लागले असून, भाजपाचे मुविकोराज कोल्हे यांनी थेट जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याकडे लेखी तक्रार दाखल करत संबंधित अधिकाऱ्यांच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. या तक्रारीमुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

तक्रारीत शाखा अभियंता योगेश अभिमन्यू अहिरे यांच्यासह अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आणि कार्यकारी अभियंता आर. डी. पाटील यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. शासकीय कामे मंजूर करून घेण्यासाठी तसेच फायली पुढे सरकवण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

दरम्यान, शाखा अभियंता योगेश अहिरे यांना नुकतेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पाच लाख रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडल्याने हे प्रकरण अधिकच चर्चेत आले आहे. एका ठेकेदाराचे रस्त्यांचे बिल मंजूर करण्यासाठी त्यांनी कार्यालयाबाहेरील कारमध्ये रक्कम ठेवण्यास सांगितल्याचा आरोप आहे. ठरल्याप्रमाणे ठेकेदाराने कारच्या सीटखाली पैसे ठेवताच एसीबीच्या पथकाने धाड टाकून अहिरे यांना ताब्यात घेतले.

या कारवाईनंतर प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, विशेष म्हणजे योगेश अहिरे यांच्याकडे जळगाव शहरातील तब्बल १८६ कोटी रुपयांच्या सिमेंट आणि समांतर रस्ते प्रकल्पांची जबाबदारी होती. अवघ्या काही वर्षांपूर्वी स्थापत्य सहाय्यक पदावर कार्यरत असलेले अहिरे पदोन्नतीनंतर शाखा अभियंता पदावर पोहोचले होते.

भाजपाचे मुविकोराज कोल्हे यांनी आपल्या तक्रारीत सार्वजनिक बांधकाम विभागात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप करत संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणामुळे जळगाव जिल्ह्यातील राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगू लागली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button