Crime
तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या 141 जणांवर कारवाई

भुसावळ प्रतिनिधी
अवैधरीत्या आरक्षण तिकिट विविध रेल्वे स्थानकांवर काढून विक्री करणाऱ्या 141 दलालांविरुद्ध मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल केले असून एक जानेवारी ते 31 डिसेंबर 2024 या दरम्यानच्या काळात दलालांवर कारवाई करण्यात आली आहे, यामुळे अवैधरित्या तिकीट विक्री करणाऱ्या दलालांचे धाबे दणाणले आहे,
तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्यांविरुद्ध रेल्वे सुरक्षा बलांकडून विशेष मोहीम विविध रेल्वे स्थानकांवर राबविण्यात आली होती यात 141 दलालांना अटक करून त्यांच्याकडून तिकिटे जप्त करण्यात आली. आर पी एफ चे वरिष्ठ आयुक्त चित्रेश जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विविध रेल्वे स्टेशनवर ही कारवाई केली.
या कारवाईत 2024 या वर्ष अखेर 141 जणांकडून संगणक लॅपटॉप आधी साहित्य सुद्धा जप्त करण्यात आले.