राज्यातील राजपूत समाजाच्या प्रलंबित मांगण्या संदर्भात डॉ. दीपकसिंग राजपूत यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा

राज्यातील राजपूत समाजाच्या प्रलंबित मांगण्या संदर्भात डॉ. दीपकसिंग राजपूत यांची मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा
जळगाव प्रतिनिधी महाराष्ट्रातील राजपूत समाजाचे युवा नेते डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री तसेच भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांची नागपूर येथे सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान डॉ. राजपूत यांनी देवेंद्र फडणवीस यांचा भगवतगीता आणि पारंपारिक शाल देऊन सन्मान केला.या भेटीत महाराष्ट्रातील राजपूत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सविस्तर चर्चा झाली. तसेच, डॉ. राजपूत यांना भविष्यातील वाटचालीसाठी मुख्यमंत्री यांनी शुभेच्छा दिल्या.
डॉ. दीपकसिंग राजपूत यांनी या भेटीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत म्हटले, “माननीय मुख्यमंत्र्यांसोबत झालेली ही भेट राजपूत समाजाच्या मागण्यांसाठी महत्त्वाची ठरली. त्यांचे आश्वासन आणि समजूतदारपणा आम्हाला आशा देतो की, आमच्या मागण्या लवकरच पूर्ण होतील. सोबत सुबोधसिंग देखील उपस्थित होते






