रावेरात रंगलेल्या भुलाबाई महोत्सवात २४ संघांचे दर्जेदार सादरीकरण


रावेरात रंगलेल्या भुलाबाई महोत्सवात २४ संघांचे दर्जेदार सादरीकरण
केशव स्मृती प्रतिष्ठान, डॉ. केतकी पाटील फाउंडेशन व रावेर नगरपालिकेचा स्तुत्य उपक्रम; तीन गटांतील विजेत्यांचा गौरव
रावेर, प्रतिनिधी : रावेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा संगीता महाजन, सर्व नगरसेविका, डॉ. केतकी पाटील फाउंडेशन आणि केशव स्मृती प्रतिष्ठान संचलित ललित कला संवर्धिनी यांच्या संयुक्त प्रयत्नातून रावेर येथे प्रथमच भव्य भुलाबाई महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. गुरुवारी (दि. १ ऑक्टोबर) नगरपालिका सभागृहात झालेल्या या महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लहान, मोठ्या आणि खुल्या गटातून तब्बल २४ संघांनी सहभागी होत भुलाबाईच्या पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडविणारे दर्जेदार सादरीकरण केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकारी रंजनाताई पाटील (मोरगाव) होत्या. व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा संगीता महाजन, दीपिका अग्रवाल, राष्ट्र सेविका समितीच्या कांता पटेल, परीक्षक पियुष रावळ, प्रान्जली रस्से, सचिन भिडे आणि डॉ. पूजा महाजन उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते भुलाबाईचे पूजन, दीपप्रज्वलन आणि आरती करण्यात आली. मोनिका महाजन यांनी भुलाबाईची आरती सादर केली. उपस्थित मान्यवरांचा शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. गौरी जोशी यांनी प्रास्ताविकातून रावेर येथे भुलाबाई महोत्सव आयोजित करण्यामागची भूमिका स्पष्ट केली आणि सहभागी स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या.
भुलाबाई संस्कृतीचे महत्त्व अधोरेखित करणारे बॅनर परिसरात लावण्यात आले होते. भाजप जिल्हा सरचिटणीस तथा डॉ. केतकी पाटील फाउंडेशनच्या संचालिका डॉ. केतकी पाटील यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संवाद साधून महोत्सवाला शुभेच्छा दिल्या.
२४ संघांचे सादरीकरण
लहान गट, मोठा गट आणि खुला गट अशा तीन विभागांतून २४ संघांनी एकामागून एक सादरीकरण केले. पारंपरिक भुलाबाई गीत, नृत्य आणि सांस्कृतिक सादरीकरणातून स्पर्धकांनी उपस्थितांची दाद मिळविली. परीक्षकांनी परीक्षण केल्यानंतर तीनही गटांचे निकाल जाहीर करण्यात आले.
नगराध्यक्षा संगीता महाजन, केशव स्मृती प्रतिष्ठानचे पियुष रावळ, सचिन भिडे, प्रान्जली रस्से, डॉ. पूजा महाजन आणि रावेरच्या नगरसेविकांच्या हस्ते विजेत्या संघांना रोख पारितोषिक, स्मृतिचिन्ह, शैक्षणिक साहित्याचे पॅड आणि सहभाग प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
असा आहे निकाल
लहान गट :
प्रथम – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
द्वितीय – शांती विद्या मंदिर, फैजपूर
तृतीय – जिल्हा परिषद शाळा, पुनखेडा
उत्तेजनार्थ – सरदार जी. जी. हायस्कूल, रावेर
मोठा गट :
प्रथम – उमरेश्वर माध्यमिक विद्यालय, दसनूर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
तृतीय – शिवफुले आखाडा, रावेर
उत्तेजनार्थ – सुज्ञा अरुण महाजन शाळा, वढोदा
खुला गट :
प्रथम – राजपूत महिला मंडळ, कोचुर
द्वितीय – आदित्य इंग्लिश मीडियम स्कूल, रावेर
तृतीय – सुंदरकांड महिला मंडळ
उत्तेजनार्थ – नेवे समाज मंडळ, भुसावळ
कार्यक्रमाला पदाधिकारी व नागरिकांची उपस्थिती
यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष रेखा बोन्डे, रावेर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्ष आशा कोळी, पूनम बोन्डे, नंदिनी पंत, सुरेखा अस्वल, शारदा चौधरी, अनिता तायडे, वंदना महाजन, शाईन शेख, मेघा भागवत, सुनीता डेरेकर यांच्यासह नागरिक व प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी सर्व संघांना भुलाबाईचा खाऊ वाटप करण्यात आला.
महोत्सवाच्या यशस्वितेसाठी नगराध्यक्षा संगीता महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका योगिता महाजन, अर्चना पाटील, सीमा जमादार, प्रमिला पाटील, जयश्री महाजन, सपना महाजन, भाग्यश्री इंगळे, अनिता तायडे, शाहीन शेख, हर्षाली महाजन, शुभांगी महाजन, रेखा बोन्डे, गौरी जोशी आणि आसावरी जोशी यांच्यासह रावेर नगरपालिका व अंबिका व्यायामशाळेचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरिता खाचणे यांनी केले, तर आभार दीपाली महाजन यांनी मानले.







