PoliticsSocial

पाणी बचतीसाठी मनपा प्रशासनाला निवेदन, तात्काळ कारवाईचे महापौर व आयुक्तांचे निर्देश!

गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाची मागणी : नळांना तोट्या बसवा, पाणी वाया घालवणाऱ्यांवर होणार कारवाई

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अल निनोच्या पार्श्वभूमीवर राज्यात संभाव्य पाणीटंचाईचे संकट लक्षात घेऊन जळगाव शहरातील पिण्याच्या पाण्याची नासाडी रोखण्यासाठी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघातर्फे आज जळगाव महानगरपालिकेच्या महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जिवने यांना निवेदन देण्यात आले.

या निवेदनात शहरातील सार्वजनिक, खाजगी पिण्याच्या पाण्याच्या नळांना तातडीने तोट्या बसविणे, पाणी वाया घालवणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करणे, पाणी बचतीबाबत जनजागृती मोहीम राबविणे, तसेच विशेष तपासणी पथके नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली होती.

निवेदनाची दखल घेत महापौर दीपमाला काळे आणि आयुक्त आदित्य जीवने यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ सूचना देत विशेष पथक नेमून आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच महापौर दीपमाला काळे यांनी जळगावकर नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा काटकसरीने वापर करून पाणी बचतीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.

यावेळी गर्जना महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे संस्थापक महासचिव भगवान सोनार, जिल्हाध्यक्ष चेतन वाणी, शहराध्यक्ष जितेंद्र कोतवाल, हेमंत पाटील, योगेश चौधरी, वसीम खान, योगेश सुने, काशिनाथ चव्हाण, विश्वजीत चौधरी, निलेश वाणी, भारती म्हस्के, विकास पात्रे, राहुल शिरसाळे, मनोहर बडगुजर, नंदू बडगुजर तसेच इतर पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महानगरपालिकेने या निवेदनाची तातडीने दखल घेतल्यामुळे आगामी पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर शहरात पाणी बचतीसाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याचा मार्ग मोकळा झाल्याची भावना उपस्थित पत्रकारांनी व्यक्त केली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button