PoliticsSocial

जळगावात शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

जळगावात शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलचा भव्य उद्घाटन सोहळा थाटात संपन्न

प्लास्टिक सर्जरी, त्वचारोग, लेझर उपचारांसह हृदयरोग व सुपरस्पेशालिटी उपचार सुविधा उपलब्ध

जळगाव, प्रतिनिधी : जळगाव येथील शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर या दोन अत्याधुनिक रुग्णालयांचा भव्य उद्घाटन सोहळा १७ ऑक्टोबर २०२६ रोजी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांच्या शुभहस्ते थाटात संपन्न झाला.

या सोहळ्याला जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार मंगेश चव्हाण, माजी मंत्री एकनाथराव खडसे, विधान परिषदेचे आमदार नंदकुमार महाजन, आमदार चंद्रकांत पाटील, आमदार चंद्रकांत सोनवणे, जळगावच्या महापौर दीपमाला काळे, माजी खासदार उल्हास पाटील, डॉ. ए. जी. भंगाळे, जळगाव डिस्ट्रिक्ट मेडिसिन डीलर असोसिएशनचे अध्यक्ष सुनील भंगाळे, जामनेरचे नगरसेवक जितेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती लक्ष्मण पाटील, जळगाव सिव्हिल रुग्णालयाचे सर्जन डॉ. आकाश चौधरी यांच्यासह महानगरपालिकेचे नगरसेवक आणि शहरातील प्रमुख डॉक्टर उपस्थित होते.

शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी, त्वचारोग आणि लेझर उपचार सुविधा

शिल्प हॉस्पिटलमध्ये प्लास्टिक सर्जरी विभागांतर्गत अपघातग्रस्त रुग्णांवरील उपचार, जळीत रुग्णांची काळजी, हाडे व रक्तवाहिन्यांच्या दुखापती, जन्मजात व्यंग, जखमा, कर्करोगाशी संबंधित काही शस्त्रक्रिया, हेअर ट्रान्सप्लांट, कॉस्मेटिक सर्जरी, स्तनांची कॉस्मेटिक सर्जरी, नाकाचा आकार सुधारण्यासाठी शस्त्रक्रिया, शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी उपचार तसेच जुन्या जखमांचे आणि भाजल्यानंतर राहिलेल्या व्रणांचे स्वरूप कमी करण्यासाठी उपचार उपलब्ध असतील. पायांवरील फुगलेल्या नसांवरही उपचार केले जाणार आहेत.

त्वचारोग व लेझर विभागात विविध त्वचारोगांवर उपचार, अनावश्यक केस कमी करण्यासाठी लेझर उपचार, त्वचेचा पोत आणि रंग सुधारण्यासाठी उपचार, फेशियल, केसगळतीवरील उपचार, लेझर रिसर्फेसिंग आणि त्वचेचे पुनरुज्जीवन यांसारख्या सुविधा उपलब्ध आहेत. याशिवाय केमिकल पीलिंग, एमएनआरएफ ट्रीटमेंट आणि कोडावरील उपचारांसह विविध सौंदर्योपचारांच्या सुविधा रुग्णांना मिळणार आहेत.

खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटलमध्ये सुपरस्पेशालिटी उपचारांची सुविधा

खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये ट्रॉमा केअर, क्रिटिकल केअर, कार्डियाक केअर आणि विविध सुपरस्पेशालिटी विभाग उपलब्ध करण्यात आले आहेत. रुग्णालयात अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (आयसीयू), अपघातग्रस्त रुग्णांसाठी ट्रॉमा केअर, शस्त्रक्रिया विभाग, प्लास्टिक सर्जरी आणि अस्थिरोग विभागाच्या सुविधा आहेत.

तसेच हृदयरोग विभागांतर्गत अँजिओग्राफी व अँजिओप्लास्टी, न्यूरोसर्जरी, युरोलॉजी आणि मेंदूविकारांवरील उपचार सुविधा उपलब्ध असतील. अत्याधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री आणि विविध विशेषज्ञ विभागांमुळे रुग्णांना एकाच ठिकाणी विविध प्रकारचे उपचार मिळण्यास मदत होणार आहे.

अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांनी सज्ज रुग्णालये

शिल्प हॉस्पिटल आणि खानदेश प्लॅटिनम हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान, शस्त्रक्रिया सुविधा आणि विविध विशेषज्ञ विभाग उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या दोन्ही रुग्णालयांच्या माध्यमातून जळगाव आणि परिसरातील रुग्णांना विविध वैद्यकीय उपचारांच्या सुविधा उपलब्ध होणार आहेत.

या भव्य उद्घाटन सोहळ्यानंतर शिल्प हॉस्पिटलचे संचालक डॉ. श्रीराज महाजन आणि डॉ. सौ. सुभा महाजन यांनी उपस्थित मान्यवर, डॉक्टर आणि सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button