
शासकीय रुग्णालयात अन्नदान, फळ वाटप
जळगाव प्रतिनिधी महापौर दीपमाला काळे यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्ष, महानगरतर्फे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे रुग्णांना फळवाटप व अन्नदान करण्यात आले. यावेळी आ. राजूमामा भोळे, महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेविका ऍड. शुचिता हाडा, नगरसेवक निलेश तायडे, अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, डॉ. धर्मेंद्र पाटील, माजी नगरसेवक मनोज काळे, जिल्हा चिटणीस मिलिंद चौधरी, आनंद सपकाळे, आरोग्यदूत शिवाजी पाटील, पितांबर भावसार, हर्षल सिखवाल, सुशील जगताप आदी उपस्थित होते.






