महा पोलीस न्यूज इम्पॅक्ट : स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय, जळगावात पोलिसांचा छापा

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली डझनभर ठिकाणी अनैतिक व्यवसाय सुरू असल्याचे वृत्त महा पोलीस न्यूजने प्रसिद्ध केले होते. महा पोलीस न्यूजने केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर स्थानिक गुन्हे शाखा आणि शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने छापा टाकत कारवाई केली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात नयनतारा आर्केड मॉलमध्ये केलेल्या कारवाईमुळे इतरांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
जळगाव शहरातील मध्यवर्ती भागासह रिंगरोड, प्रभात कॉलनी परिसर, मेहरुण परिसर, खोटे नगर अशा परिसरात जवळपास १२ ठिकाणी स्पा सेंटर सुरू आहेत. शहरातील स्पा सेंटर चालकांकडे आवश्यक त्या परवानग्या तर नाहीच शिवाय काही ठिकाणी खास सेवा देण्याच्या बहाण्याने स्पाच्या नावाखाली बंद दरवाजा आड अनैतिक व्यवसाय केला जात होता. महा पोलीस न्यूजने याबाबत वृत्त प्रकाशित करीत त्याचा पाठपुरावा सुरू केला होता.
नयनतारा मॉलमध्ये सुरू होता व्यवसाय
स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना गोपनीय बातमी मिळाली होती की, जळगाव शहरातील गोविदा रिक्षा स्टॉप जवळ जळगाव जवळील नयनतारा आर्केड मॉल ०३ डे स्पा सेंटर शॉप नं.४०८ येथे स्पा सेंटरच्या आड गिऱ्हाईकांना शरीरसंबंधासाठी स्पा मसाज करणाऱ्या महीला करवी वेश्या व्यवसाय करण्यात येत आहे. मसाज पार्लर हे जळगाव शहर पोलीस ठाणे हद्दीत असल्याने, सदरबाबतीत जळगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अनिल भवारी सो यांना कळवुन स्पा मसाज पार्लरवर बनावट ग्राहक पाठविण्यात आले होते.
ग्राहकाला आमीष देताच छापा, ४ महिलांची सुटका
बनावट ग्राहकास स्पा सेंटरचा मॅनेजर राजु माधुजी जाट रा.कलोधिया तहसिल पिंपरी जि.भिलवाडा राजस्थान याने बनावट ग्राहकास स्पा मसाज व्यतीरिक्त इतर सेवा देण्याची आमिष दिल्याने सदर स्पा सेंटरवर छापा टाकण्यात आला होता. स्पा सेंटरचा मॅनेजर हा तिथे असलेल्या ४ महिलांकडून स्पा मसाज सेंटरच्या आड देहविक्रीचा व्यवसाय करीत होत्या. त्याला स्पा मालक विक्रम राजपाल चंदमारी ढानी वय २० वर्ष, रा.वार्ड नं.०६ चत्तरगढ पत्ती जि.सिरसा, हरीयाणा हा प्रोत्साहन देत होता म्हणुन त्यांच्या दोघांविरुध्द पिटा अॅक्ट प्रमाणे जळगाव शहर पो.स्टे. ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ४ पिडीत महिलांची सुटका करुन त्यांना आशादिप निराधार महिला वस्तीगृह जळगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे.
या पथकाने केली कारवाई
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेडडी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी, संदिप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबी पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर पोलीस निरिक्षक अनिल भवारी, सहा. पोलीस निरिक्षक शितलकुमार नाईक, पोउपनिरिक्षक शरद बागल, पोलीस उपनि महेश घायतड, सहा. फौजदार विजयसिंह पाटील, अतुल वंजारी, सुनिल पाटील, हवालदार अक्रम शेख, विजय पाटील, योगेश पाटील, महिला श्रे. पोउपनि वैशाली महाजन, मपोहवा प्रियंका कोळी, मंगला तायडे, चालक दिपक चौधरी अशांनी केली आहे.