Politics

जळगांव जिल्ह्यातील अतिवृष्टी झालेल्या महसूल मंडळे मधील गावांना तत्काळ मदत देण्यात यावी

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने मागणी.

जळगाव तालुक्यातील सर्व मंडळातील दिनांक 15,16,17 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटी सदृश्य अतिवृष्टीमुळे शेत पिके तसेच घरांचा मालमत्तेचा नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करून नुकसान भरपाई मिळण्याबाबत आज दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते,पदाधिकारी,कार्यकर्ते तसेच सर्व सामान्य शेतकरी व नागरिक यांनी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हाधिकारी यांना केली.

सलग तीन दिवस ढगफुटी सदृश्य अतिवृष्टी झाल्याने शेत पिके तसेच घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण शासन स्तरावर तलाठी,सर्कल,ग्रामसेवक तसेच कृषी सहाय्यक व तालुका कृषी अधिकारी आदींचा मार्फत तात्काळ सरसकट पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत शासनाला कळवावे जळगाव तालुक्यातील पीक विमा मंजूर करण्यात यावा व तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.या वेळी श्री.गुलाबरावजी वाघ साहेब शिवसेना उपनेते,जिल्हाप्रमुख श्री.कुलभूषण भाऊ पाटील,शिवसेना उप जिल्हाप्रमुख प्रा.भाऊसाहेब सोनावणे,शेतकरी अशोक खंडू बडगुजर,प्रमोद घुगे,योगेश चौधरी,गुलाबराव कांबळे,डॉ.रमाकांत कदम,सचिन चौधरी,राजेंद्र पाटील,अशोक पाटील,योगेश पाटील,विजय बांदल,हनु पठाण,किरण ठाकूर व पदाधिकारी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button