Social

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रभेट

SIR मोहिमेच्या पहिल्याच दिवशी प्रांताधिकाऱ्यांची प्रत्यक्ष क्षेत्रभेट

अमळनेर | प्रतिनिधी विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) मोहिमेस ३० जूनपासून प्रारंभ झाला असून, ३० जून ते २९ जुलैदरम्यान ही मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेच्या पहिल्याच दिवशी अमळनेरचे मतदार नोंदणी अधिकारी तथा प्रांताधिकारी मयूर भंगाळे यांनी प्रत्यक्ष क्षेत्रभेट देत BLOच्या कामकाजाची पाहणी केली.

यावेळी त्यांनी BLO प्रत्यक्ष क्षेत्रात जाऊन काम करत आहेत का, मतदारांकडून गणना प्रपत्र व्यवस्थित भरून घेतले जात आहे का तसेच कामकाजादरम्यान कोणत्या अडचणी येत आहेत, याची सविस्तर माहिती घेतली. उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आवश्यक सूचना व मार्गदर्शन करून SIR मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

भेटी दरम्यान, भाग क्रमांक १६९ चे BLO तथा शिक्षक अजय भामरे हे क्षेत्रात काम करत असताना प्रांताधिकाऱ्यांनी त्यांच्या कामाची अचानक पाहणी केली. यावेळी त्यांनी मतदार प्रा. अशोक पवार यांच्या निवासस्थानी प्रत्यक्ष भेट देऊन गणना प्रपत्र भरून घेतले तसेच त्याची एक प्रत त्यांना सुपूर्द केली. या पाहणीत BLOच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त करत मतदारांपर्यंत अचूक व वेळेत सेवा पोहोचविण्याच्या सूचना देण्यात आल्या.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १६ वर्षांपासून कार्यरत. शोध पत्रकारिता, क्राईम रिपोर्टींगचा १५ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, प्रशासन, क्रीडा, संस्कृती, उद्योग जगतातील विशेष लेखन. विविध दैनिक, मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. सोशल मीडिया मॅनेजमेंट, इमेज बिल्डिंग, मार्केटिंग, ब्रॅण्डिंग यासारख्या विविध क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव. संपर्क : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button