प्रभु श्रीराम चरणी लीन होऊन जळगाव शहरात स्मिता वाघ यांची प्रचाराला सूरवात
महा पोलीस न्यूज | २८ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार स्मिता वाघ यांनी दि.२६ एप्रिल पासून जळगाव शहरात प्रचाराची सुरुवात केली. सर्व प्रथम जळगावाचे ग्राम दैवत प्रभु श्रीराम मंदिर येथून सकाळी ९ वाजता श्रीराम मंदिराचे ह.भ.प.मंगेश महाराज यांचे आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात करण्यात आली.
सायंकाळी ५ वाजता रिंग रोड येथील श्री हनुमान मंदिर येथून मारुतीरायाचे दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रचार रॅलीला सुरुवात झाली. रॅलीत जेडीसीसी कॉलनी, रिंग रोड, यशवंत कॉलनी, गणेश कॉलनी, नंदनवन कॉलनी व इतर भागांचा देखील समावेश होता. यादरम्यान शहराचे आ.सुरेश भोळे यांच्या “चंद्रमौळी” या निवासस्थानी स्मिता वाघ यांचे भव्य स्वागत करण्यात आले. माजी महापौर सीमा भोळे यांनी औक्षण केले. उपस्थित महिला नागरिक व जेष्ठाचे आशीर्वाद घेतले.
याप्रसंगी आ.राजुमामा भोळे, महानगर अध्यक्षा उज्वला बेंडाळे, माजी उपमहापौर अश्विन सोनवणे, प्रदेश महिला सचिव रेखा वर्मा, माजी नगरसेविका ऍड.शुचिता हाडा, दिपमाला काळे, आरपीआयएचे अनिल अडकमोल, शिवसेनेच्या अध्यक्ष सरिता कोल्हे माळी, मंडल अध्यक्ष मनोज काळे, केदार देशपांडे अरविंद देशमुख, दिलीप पोकळे, विशाल त्रिपाठी, गायत्री राणे, सरोज पाठक, आशिष सपकाळे यासह महायुतीचे पदाधिकारी व कायकर्ते मोठ्या संख्येसह उपस्थित होते.