स्मिता वाघ यांनी सुरू केला धरणगावमध्ये प्रचार
महा पोलीस न्यूज | २९ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातील महायुतीच्या उमेदवार स्मिता वाघ यांनी जळगाव ग्रामीण, धरणगाव तालुक्यात प्रचाराला सुरुवात केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शेतकरी, तरुण, महिला, व्यापारी यांच्यासह सर्वसामान्यांचा विश्वास कायम असून स्मिता वाघ यांना जळगाव लोकसभा मतदारसंघातून कमीतकमी पाच लाखांचा लीड मिळणारच, असा विश्वास महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारार्थ धरणगाव येथे कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा पार पडला. या मेळाव्यात सहभागी होत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या पाठिशी मतदानरुपी उभे राहण्याचे आवाहन केले.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, संजय पवार, निलेश पाटील, डॉ. राधेश्याम चौधरी, अजय भोळे, संजय पाटील, पी. सी. आबा पाटील, ज्ञानेश्वर महाजन, सुभाष आण्णा, माधुरी अत्तरदे, शेखर अत्तरदे, संजयभाऊ महाजन, डी.ओ. पाटील, जीजाबराव पाटील, विलास महाजन, श्यामदादा पाटील, अनिल पाटील, पी.एन.पाटील, डी. जी भाऊसाहेब, संजय पवार, गजानन पामळे, मुकुंद नन्नवरे, भगवान महाजन यांच्यासह महायुतीचे अन्य कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
त्याआधी शिरसोली येथे महायुतीचा मेळावा पार पडला. उपस्थितांमध्ये उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले. संबंधित भागातील महत्वाच्या प्रश्नावर सखोल चर्चा झाली. यावेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, निलेश पाटील, संजय पवार, मुकुंद रोटे, जमील देशपांडे, प्रभाकर सोनवणे, लालचंद पाटील, संतोष आंबटकर, मनोहर पाटील, रमेश पाटील, राजुभाऊ सोनवणे, जितेंद्र पाटील, नंदु पाटील, ब्रिजलाल पाटील, हर्षल चौधरी, शिवराज पाटील, डॉ. कमलाकर पाटील, रामकृष्ण पाटोले, भाऊसाहेब पाटील, संजय पाटील व भारतीय जनता पक्ष – महायुतीचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी जळगाव शहरातील शिवाजी नगर परिसर प्रभाग क्रमांक १ मध्ये भेटीगाठी घेतल्या. यावेळी स्मिता वाघ व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी खडके चाळ येथील हनुमान मंदिरात जावून दर्शन घेतले. अनेक नागरिकांशी संवाद साधला. नागरिकांच्या समस्यांचे उपाय व शहराचा तसेच देशाचा विकास हेच आपले ध्येय आहे, असे आश्वासन दिले.
यावेळी जळगाव शहराचे आमदार राजुमामा भोळे, डॉ. राधेश्याम चौधरी, सरिता माळी, उज्ज्वला बेंडाळे, अनिल अडकमोल, जितू मराठे, अरविंद देशमुख, दीपक सूर्यवंशी, विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, सुनील खडके, नगरसेवक नवनाथ दारकुंडे, दिलीप पोकळे, मंगेश नवघरे, राजू मराठे, अमजद खान पठाण, लता बाविस्कर, जहांगीर खान, महेश पाटील, संजय शिंदे, दिनेश पुरोहित, आनंद सपकाळे, योगेश पाटील, सय्यद शेख, लक्ष्मीकांत तिवारी, विनय चौधरी, रितेश जाधव, संजय सोनवणे, गणेश फेगडे, वैशाली पाटील, दीप्ती चिरमाडे, ज्योती राजपूत आणि महायुतीचे कार्यकर्ते व सर्व पदाधिकारी उपस्थित होते.