राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील स्पर्धकांचे घवघवीत यश

राज्यस्तरीय योगासन स्पर्धेत जळगाव जिल्ह्यातील स्पर्धकांचे घवघवीत यश
जळगाव – महाराष्ट्र योगासन स्पोर्टस फेडरेशन च्या वतीने राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचे आयोजन छत्रपती संभाजी नगर आणि चंद्रपूर येथे विविध गटांमध्ये दिनांक 30 आणि 31 ऑगस्ट 2025 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी जळगाव जिल्हा योगासन स्पोर्टस असोसिएशन च्या वतीने जुलै महिन्यात निवड चाचणी घेण्यात आली होती. या निवड चाचणीमध्ये सुवर्णपदक विजेत्यांना राज्यस्तरीय योगासन स्पर्धेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आणि त्यापैकी खालील स्पर्धकांनी योगासन स्पर्धेत सहभाग नोंदवून विविध योगासन क्रीडा प्रकारातआपले उत्तम सादरीकरण करून पदके प्राप्त केली.
पदक प्राप्त विजेत्यांची नावे.
डॉ.शरयू विसपुते – सुवर्ण पदक , (फॉरवर्ड बेंड योगासन प्रकार ), डॉ.शरयू विसपुते – कांस्य पदक
(ट्विस्टिंग योगासन प्रकार ), किरण लुल्ला – सिल्वर पदक
(ट्विस्टिंग योगासन प्रकार ), चंचल माळी – सिल्वर पदक , (सुपाईन योगासन प्रकार ) 4 दीपाली महाले – कांस्य पदक (हँड बॅलन्स योगासन प्रकार )
जळगाव जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन चे अध्यक्ष श्री. सतीशजी मोहगावकार, उपाध्यक्ष डॉ. देवानंद सोनार, सचिव प्रा. पंकज खाजबागे, कोषाध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण बेलोरकर आदींनी अभिनंदन केले आहे. स्पर्धकांना योगासन स्पर्धेबाबत मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम योग विभागामध्ये प्रा. पंकज खाजबागे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. राज्यस्तरावर सुवर्णपदक प्राप्त स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरील योगासन स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत त्यामुळे डॉ. शरयू विसपुते यांना पुन्हा एकदा राष्ट्रिय आणि आंतरराष्ट्रिय स्पर्धेत सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी त्यांना सर्वांनी शुभेच्छा दिल्या आहेत






