जळगावात हॉटेलमध्ये छापा : रूमचा लाईट २ वेळा बंद-सुरू होताच धडकले पोलीस!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एच सेक्टरमध्ये पोलिसांनी सापळा रचून छापा टाकला असून त्याठिकाणी कुंटणखाना सुरू असल्याच्या माहितीवरून कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी हॉटेलमधून ३ महिलांची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी २ ग्राहक आणि १ मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम एमआयडीसी पोलीस ठाण्यात सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एमआयडीसी परिसरात असलेल्या एच सेक्टरमध्ये हॉटेल तारा आहे. हॉटेलमध्ये काही महिलांकडून देहविक्री व्यवसाय केला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या सूचनेनुसार एएचटीयू पथकाने बुधवारी सायंकाळी सापळा रचला.
रूमचा लाईट २ वेळा बंद-सुरू करण्याचा सिग्नल
एमआयडीसी परिसरात असलेल्या एच सेक्टरमधील हॉटेल सागरजवळच हॉटेल तारा आहे. हॉटेलमध्ये बनावट ग्राहक पाठवून त्याने खोलीत गेल्यावर लाईट २ वेळा बंद सुरू करण्याचे ठरलेले होते. सिग्नल मिळताच पथकाने त्याठिकाणी छापा टाकला. हॉटेलमधून ३ महिलांची सुटका करण्यात आली असून २ ग्राहक, १ मालक यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधिक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत, गृह उपअधीक्षक अरुण आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली
AHTU शाखेच्या प्रभारी अधिकारी योगिता नारखेडे, पोलीस उपनिरीक्षक दिनेश बडगुजर, सहाय्यक फौजदार संजय हिवरकर, विठ्ठल फुसे, रवींद्र गायकवाड, निलिमा सुशीर, हवालदार दिपक पाटील, भूषण कोल्हे, मनीषा पाटील, वाहिदा तडवी यांनी केली आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






