शासन परिपत्रक : कार्यालयीन ओळखपत्र लावणे बंधनकारक

शासन परिपत्रक : कार्यालयीन ओळखपत्र लावणे बंधनकारक
जळगाव प्रतिनिधी I महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी एक महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. त्यानुसार राज्यातील सर्व शासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कार्यालयात प्रवेश करताना व कार्यालयात असताना आपले कार्यालयीन ओळखपत्र दर्शनी भागावर लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.
यापूर्वी दिनांक ७ मे २०१४ रोजी व दिनांक १० ऑक्टोबर २०२३ रोजी यासंदर्भात सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, अद्याप काही अधिकारी व कर्मचारी या सूचनांचे पालन करत नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे.
त्यानुसार शासनाने आता १० सप्टेंबर २०२५ रोजी एका शासकीय परिपत्रकानुसार स्पष्ट सूचना दिल्या आहेत की,
१) प्रत्येक शासकीय अधिकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात असताना ओळखपत्र दृश्यमान ठेवावे.
२) या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल.
या सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुख व विभाग प्रमुख यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
सदर परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संकेतांक २०२५०९१०१८०५५२२७०७असा आहे. हे परिपत्रक महाराष्ट्र राज्यपालांच्या आदेशानुसार व नावाने डिजिटल स्वाक्षरीसह जारी करण्यात आले आहे





