भडगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी

भडगाव तालुक्याला ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई द्यावी
तहसीलदार शितल सोलाट यांना महाविकास आघाडीतर्फे निवेदन
भडगाव – प्रतिनिधी
भडगाव तालुक्यात अतिवृष्टी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे व व्यापाऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना निकष न लावता त्वरित नुकसान भरपाई द्यावी. व भडगाव तालुक्याला तुला दुष्काळ जाहीर करावा. असे निवेदन महाविकास आघाडीतर्फ तहसीलदार शितल सोलाट यांना देण्यात आले.
तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या वर्षी पावसाने में महिन्यापासून जो हाहाकार माजवला आहे.त्यामुळे रब्बी हंगाम आणि खरीप हंगाम ह्या दोन्ही वेळेस शेतकरयांचा माल काढण्यासाठी संपूर्ण तयार झाला होता.दोनही वेळेस अचानक आलेल्या अतिप्रचंड पावसामुळे दोन्ही हंगामचे शेतकरयांचे संपूर्ण नुकसान झाले आहे. काही ठिकाणी शेतकऱ्यांचे पश्चन पाण्यात वाहून गेले आहे.शेतीचेही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. तरी आपण आपल्या मार्फत मायचाम सरकारला पंजाब सरकारने ज्या पद्धतीने सरसकट हेक्टरी ५०,०००/- रुपये मदत जाहीर केली आहे. त्याप्रमाणे महाराष्ट्रातही कोणतेही निकष न लावता भरपाई देण्यात यावी.अतिवृष्टी मुळे भडगाव शहरातील व्यापारी व लहान मोठे व्यावसाविक यांचे ही प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांचा व्यवसाय ठप्प होऊन उदरनिर्वाहचे साधने बंद झाली आहेत. व्यापारी व व्यवसायिकांना शासनाने भरीव आर्थिक मदत करावी.
तरी आपण आमच्या निवेदनाची दखल घेऊन शासन दरबारी याचा पाठपुरावा करून शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक यांना आलेल्या संकटात शासनाने भरीव आर्थिक मदत करावी.तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा असे निवेदन तहसीलदार शितल सोलाट यांना देण्यात आले यावेळी दीपक पाटील, श्यामकांत पाटील सर,शंकर मारवाडी,चेतन पाटील,संदीप ठाकरे,संदीप सपकाळ, सागर पाटील, यश पाटील, उमेश पाटील,रोनित अहिरे देवेंद्र परदेशी,यश महाजन,प्रथमेश गायकवाड,जयेश पाटील,सोनू गिरासे,संजय पाटील,रविंद्र पाटील,आबा कासार,
कुणाल पाटील,योगेश महाजन
राजु शेख,साहेबराव पाटील,
तन्बीर खान आदींसह कार्यकर्त्यांच्या निवेदनावर सह्या आहेत.






