दुचाकी चोराला भडगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या !

दुचाकी चोराला भडगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
चार दुचाकींसह मुद्देमाल हस्तगत
भडगाव I प्रतिनिधी
भडगाव शहरातील कराब रस्त्यावरील रामकृष्ण नगर मधील नाना धनगर यांची मोटरसायकल चोरीच्या व लबाडीच्या इराद्याने घेऊन गेला म्हणून भडगाव पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.भडगाव पोलिसांनी या गुन्ह्याचा तपास लावत बोरमडी ता.शिरपूर येथील एका ताब्यात घेऊन विचारणा केली असता त्याने अजून तीन मोटरसायकल चोरी केल्याचे निष्पन्न झाले याबाबत आरोपीला भडगाव पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,दि.२६/०९/२०२५ रोजी चे सकाळी ०५ वाजे सुमारास कराब रोड रामकृष्ण नगर भडगाव येथील फिर्यादी -नाना नामदेव धनगर (वय ६३) यांचे घरासमोरुन एक होंडा शाईन कंपनीची तिचा क्र.एम. एच १९.डी.डी.३७२९ ही मोटरसायकल चोरी गेल्याची तक्रार भडगाव पोलीस स्टेशनला दिली यानंतर भडगाव पोलिसांनी तपासात मोटरसायकल चोर व आरोपी इंद्रसिंग भिमा पावरा रा. बोरमडी ता. शिरपुर जि. धुळे हा याने फिर्यादीचे संमती वाचून लबाडीचे इराद्याने चोरुन नेली होती म्हणून यातील फिर्यादी यांच्या फिर्यादवरुन भडगाव पोलीस स्टेशन गुरन ३५९/२०२५ बी.एन.एस २०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर आरोपीस गुन्ह्यातील चोरी केलेली मोटार सायकलसह पकडला.त्यानंतर सदर आरोपी भडगाव पोलीस स्टेशन येथे आनत विचारपूस केली असता त्यांच्याकडेस त्याने इतर सुद्धा चोरी केलेल्या मोटरसायकलची कबुली दिली. ०३ मोटार सायकली या गुन्हयाचे अनुषगाने जप्त करण्यात आलेल्या आहे. सदर वडगाव पोलीस स्टेशन येथे या चारही मोटरसायकल जप्त करण्यात आलेआहे. एकुण १,७०,०००/- रु. मुद्देमाल जप्त.
करण्यात आला आहे.
वरील क्र. १ ते ३ मोटार सायकल गाडीचे मालक निष्पन्न झाले असुन क्र. ०४ मधील मोटार
सायकलचा मालक निष्पन्न करणे आहे.
सदरची कामगिरी मा.पोलीस अधिक्षक माहेश्वर रेड्डी जळगाव,अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर चाळीसगाव परिमंडळ, उपविभागीय पोलीस अधिकारी विजयकुमार ठाकुरवाड चाळीसगांव भाग यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश शर्मा,स.फौ. भरत लिंगायत, पो.हे.काँ.निलेश ब्राम्हणकार, पो.हे.कॉ.विजय जाधव,पो.कॉ.सुनिल राजपुत, पो.कॉ.संदीप सोनवणे, चालक पो.कॉ.संजय पाटील, अशांनी केली असून गुन्हाचा पुढील तपास पो.हे.कॉ.विजय जाधव हे करीत आहेत.






