Sport

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्राला १० सुवर्णपदकांसह १९ पदके

अशोक जैन, रवींद्र नाईक, देबासीस दास, ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान

जळगाव  (क्रीडा प्रतिनिधी) – सीआयएससीई सहाव्या राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी आघाडी घेत एकूण १९ पदके पटकवली. त्यात १० सुवर्ण, ४ रौप्य आणि ९ कांस्य पदकांचा समावेश आहे. विशेष म्हणजे स्पर्धेचे आयोजक असलेल्या जळगावच्या अनुभूती स्कूलच्या तीन विद्यार्थीनींनी पदके मिळवत महाराष्ट्राच्या वर्चस्वात मोलाची कामगिरी बजावली. विजेत्या खेळाडूंना जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, जिल्हा क्रीडा अधिकारी रवींद्र नाईक, अनुभूती स्कूलचे प्राचार्य देबासीस दास, आंतरराष्ट्रीय पंच ए. टी. राजीव यांच्या हस्ते पदके प्रदान करण्यात आली.

सीआयएससीई सहावी राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेला अनुभूत स्कूल येथे १६ सप्टेंबर रोजी सुरुवात झाली होती. १९, १७ आणि १४ वर्षांखालील गटातील या स्पर्धेत देशभरातून ३०० पेक्षा जास्त विद्यार्थीनींनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत १४ वर्षाच्या गटात सर्वोत्तम खेळाडू महाराष्ट्रातील दिशा मेहता ठरली. १७ वर्षाच्या गटात कर्नाटक आणि गोवामधील पूर्विका एम हिने सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकवला. १९ वर्षाखालील गटात उत्तर प्रदेशची दिवा गुप्ता हिची सर्वोत्तम खेळाडू म्हणून निवड झाली. १९ वर्षांआतील वयोगटातील स्पर्धेत जळगावच्या अनुभूती स्कूलची अलेफिया शाकीर हिने ६८ किलो वजन गटात कांस्यपदक मिळवले. तसेच ४९ किलो गटात अनुभूती स्कूलची समृद्धी कुकरेजा हिला कांस्यपदक मिळवले. अनुभूती स्कूलच्या पलक सुराणा हिलाही रौप्य पदक मिळाले.

 

राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेसाठी जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रमुख अरविंद देशपांडे आणि जैन स्पोर्ट्स अकॅडमीचे प्रशिक्षक अजित घारगे, जयेश बाविस्कर, महेश घारगे, रवींद्र धर्माधिकारी, प्रविण ठाकरे, समीर शेख, मोहम्मद फजल, सुयश बुरकूल, किशोर सिंग, वाल्मिक पाटील, सोनाली हटकर, घनश्याम चौधरी, उदय सोनवणे, राहुल निभोंरे, सैय्यद मोहसीन, अब्दुल मोसीन जब्बार, योगेश धोंगडे, दिपिका ठाकूर यांनी परिश्रम घेतले.

सहाव्या आयएससीई राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी गट निहाय पदके खालील प्रमाणे आहेत

१७ वर्षांखालील ६८ कि. वजन गट -सुवर्णपदक- खुशी एस. (कर्नाटक-गोवा), रौप्यपदक- हिना कुमारी. (बिहार-झारखंड), कांस्य पदक- निया दोषी (महाराष्ट्र), स्वागतिका (ओडिसा)

६३ कि. गटातून – सुवर्ण – मंजिरी तळगावकर (महाराष्ट्र), रौप्य – अनिका (कर्नाटक-गोवा),

रौप्य- तनिष्का शर्मा (उत्तरप्रदेश) समयाराणी(ओडिशा)

१७ वर्षांखालील ५२ कि. वजन गट – सुवर्णपदक-  विरती बेदमुथा (महाराष्ट्र), रौप्यपदक- माहिका (उत्तर भारत) तर अनुष्का मुद्री, देवांगी चक्रबर्ती यांना कांस्य पदक मिळाले.

४९ कि. गटातून कर्नाटक-गोवाच्या पूर्विका ए हिला सुवर्ण, महाराष्ट्राच्या सर्वज्ञा हिला रौप्य, आंध्र व तेलंगणाच्या हर्षिका व नॉर्थवेस्टच्या अबिया वरुगेसी यांना कांस्य पदक मिळाले.

४४ कि. गटातून नॉर्थवेस्टची जया देसाईला सुवर्ण, उत्तर प्रदेशची श्रेया गुप्ता हिला रौप्य पदक, हिरा महस्त्रिया व दमंजोत कौर यांना कांस्यपदक मिळाले.

३५ कि. गटातून – सुवर्ण – स्वस्तिका (महाराष्ट्र) रौप्य- आद्या शर्मा (उत्तर प्रदेश) रौप्य पदक – अप्सरा परवीन (बिहार झारखंड), ए. शहया (तमिळनाडू, पॉडेचेरी व अंदमान-निकोबार)

याच वयोगटातील ३२ कि. गटातून उत्तर प्रदेशची मिठी राठीला सुवर्ण तर उत्तर भारताची क्रितीका हिला रौप्य पदक मिळाले.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button