Social
जळगाव जिल्हा परिषदेतील ८ जणांना पदोन्नती

जळगाव / प्रतिनिधी (दि. 19 ऑगस्ट 2025):-जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेअंतर्गत कार्यरत असलेल्या एकूण ८ कर्मचारी-अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली आहे.
यामध्ये
• ग्रेडेड मुख्याध्यापक ते विस्तार अधिकारी – १
• पदवीधर शिक्षक ते केंद्रप्रमुख – ३
• वरिष्ठ सहाय्यक (लेखा) ते कनिष्ठ लेखाधिकारी – ४
अशा प्रकारे एकूण ८ जणांना पदोन्नती मिळाली आहे.
या कार्यक्रमप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, मुख्य लेखा व वित्त अधिकारी बाबुलाल पाटील, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) सचिन परदेशी, उपशिक्षणाधिकारी विजय सरोदे, नरेंद्र चौधरी आदी उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांनी पदोन्नती मिळालेल्या सर्वांना अभिनंदन केले.






