तळबण तांडा येथील कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट

तळबण तांडा येथील कापूस व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट
भडगाव प्रतिनिधी तालुक्यातील तळबण तांडा येथील शेतकऱ्यांची कापूस व्यापारी यांच्याकडून सर्रास लूट सुरू असून लूटमार करणाऱ्या चाळीसगाव तालुक्यातील व्यापाऱ्याला कापूस विकणाऱ्या शेतकऱ्यांनी व्यापारी व कापूस मोजणारा मापाडी यांना मापात पाप करताना रंगेहात पकडले यात मापाडी करून ४० किलोच्या तोल मागे ९ किलो जास्तीचा कापूस घेत असल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या लक्षात आल्याने एकच खळबळ उडाली यात कापूस व्यापारी गाडी व कामगार यांना सोडून पसार झाला कापसाची अर्धवट मोजलेली गाडी जागेवरच शेतकऱ्याच्या घराजवळ असून गाडीच्या चारही चाकांची हवा काढण्याचे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलेत्यावेळी मापाडीला पकडून शेतकऱ्यांनी विचारपूस केली असता त्याच्याकडून उत्तर शेतकऱ्यांना मिळत होती.
तात्काळ भडगाव पोलीस स्टेशनला खबर दिली असता तात्काळ घटनास्थळी पोलीस दाखल होऊन सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिसांनी मापाडी व मोजमाप करण्याचे साहित्य काटा जप्त करून पोलीस स्टेशनला आणण्यात आल्याचे शेतकऱ्यांकडून समजले यात सदर व्यापारी चाळीसगाव तालुक्यातील असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले तसेच सदर व्यापारी हा गेल्या २ डिसेंबर पासून गावात कापसाच्या गाड्या भरत असून यात शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट झाल्याचे स्थानिक शेतकऱ्यांमधून बोलले जात आहे.
सदर मापाडीला भडगाव पोलीस स्टेशन येथे आणले असता त्याच्याकडून काटा व इतर साहित्य जप्त केलेले असून मापाची चौकशी सुरू होती.. अवकाळी ने मारलेल्या शेतकऱ्यांना आता मात्र व्यापाऱ्यांकडून देखील सर्रास लूट होताना दिसत आहे अशा घटनांना आळा बसेल का असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहे.. स्थानिक शेतकऱ्यांनी पोलीस स्टेशन येथे तक्रार देण्यासाठी आले होते मात्र गुन्हा दाखल का झाला नाही असे एक ना अनेक प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित होत आहेत रात्री उशिरापर्यंत ही गुन्हा दाखल झाल्याची नोंद नाही.






