भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर

भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण जाहीर
भडगाव|प्रतिनिधी l भडगाव येथे पंचायत समिती सभागृह, भडगाव तालुक्यातील ४९ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण तहसिलदार भडगाव यांचे अध्यक्षतेखाली निश्चित करण्यात आले. तसेच त्याच दिवशी दुपारी ४ वाजता उपविभागीय अधिकारी पाचोरा भाग पाचोरा यांचे अध्यक्षतेखाली भडगाव तालुक्यातील संपूर्ण ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदांपैकी एक द्वितीयांश सरपंच पदे महिला यांच्यासाठी आरक्षित करण्यात आले. यावेळी तहसीलदार रमेश देवकर ,लिपिक महादू कोळी यांच्या सह तहसील कार्यालय कर्मचारी आदि उपस्थित होते. या आरक्षण सोडत ला नागरिकांची अत्यल्प उपस्थिती पाहायला मिळाली. आरक्षण सोडत चिठ्ठी बालविकास शाळेचा इयत्ता चौथीचा विद्यार्थी सिद्धेश्वर वाल्मीक पाटील या विद्यार्थ्यांच्या हस्ते काढण्यात आल्या.
भडगाव तालुक्यातील ४९ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे आरक्षण खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आले.
अ.क्र,१ अनुसूचीत जाती साठी ६ ग्रामपंचायत राखीव आहे. त्या पैकी ३ गावांचे महिला आरक्षण आज काढण्यात आले.