अमळनेर येथे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर

अमळनेर येथे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत मोफत वैद्यकीय तपासणी शिबिर
अमळनेर प्रतिनिधी I येथील इंदिरा गांधी भवन येथे लायन्स क्लब ऑफ अमळनेर तर्फे सेवा सप्ताह उपक्रमांतर्गत महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी, होमगार्ड तसेच नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शुक्रवार दि. ३ ऑक्टोबर रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ या वेळेत झालेल्या या शिबिरात बीपी, रॅन्डम ब्लड शुगर, हिमोग्लोबिन, स्त्रीरोग तपासणी, नेत्र तपासणी, फिजिओथेरपी तसेच हृदयरोग तपासणी अशा विविध सेवांचा लाभ २२० स्त्री -पुरुष कर्मचारीनां मिळाला.
या शिबिरात डॉ. निखिल बहुगुणे हृदयरोग तज्ञ, डॉ. युसुफ पटेल, डॉ. मिलिंद नवसारीेकर, डॉ. सुमित सूर्यवंशी अस्थिरोग तज्ञ, डॉ. नरेंद्र महाजन ,नेत्ररोग तज्ञ, डॉ. पंकज चौधरी शल्य चिकित्सक, डॉ. रवींद्र जैन, स्त्रीरोग तज्ञ डॉ. स्वप्ना पाटील तसेच फिजिओथेरपिस्ट डॉ. ऋतिक कोठारी यांनी आपली सेवा बजावली.
या प्रसंगी उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे, तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम, होमगार्ड कमांडिंग अरुण नेरकर, नायब तहसीलदार सी. यू. पाटील आदींसह महसूल, पोलीस व अग्निशमन विभागातील कर्मचारी उपस्थित होते.
उपविभागीय अधिकारी नितीन मुंडावरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, “आपल्या धकाधकीच्या जीवनशैलीत वेळोवेळी आरोग्य तपासणी करून घेतली पाहिजे. हे शिबिर कर्मचारी वर्गासाठी उपयुक्त ठरेल.” असे ते म्हणाले.
शिबिर यशस्वी २२० कर्मचारी नो लाभ घेतला. लायन्स क्लब अध्यक्ष डॉ. संदीप जोशी, सेक्रेटरी महेंद्र पाटील, खजिनदार नितीन विंचूरकर, प्रोजेक्ट चेअरमन डॉ. किशोर शहा, डॉ. रवींद्र जैन यांच्यासह लायन्स क्लबचे सदस्य योगेश मुंदडा, विनोद अग्रवाल, एसडी. भरुचा, महावीर पहाडे, रवींद्र कॉलरा,राजेश जीवनानी, शेखर धनगर, कमलेश भंडारी,चेतन जैन, प्रदीप जैन, अजय हिंदुजा, उदय शहा, महेश पवार, अभिनय मुंदडा, पंकज मुंदडा आदींनी विशेष परिश्रम घेतले.






