
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । अखिल भारतीय तैलिक महासभेचे प्रांतीय उपाध्यक्ष काकासाहेब हिरालाल मगनलाल चौधरी यांचे वयाच्या ८६ व्या वर्षी दीर्घ आजाराने आज दि.१५ रोजी शनिवार पहाटे ३ वाजेच्या सुमारास निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा दुपारी ३.०० वाजता राहते घरून निघणार आहे. अंतिम संस्कार विधी सहकार महर्षी पी.के.पाटील महाविद्यालय प्रांगणात कोकणी हिल दंडपाणेश्वर रोड, नंदुरबार येथे करण्यात येणार आहे.
काकासाहेब हिरालाल चौधरी हे धुळ्याच्या माजी महापौर प्रतिभाताई शिवाजीराव चौधरी आणि भाजपा प्रदेशमहामंत्री विजय चौधरी यांचे काका आणि माजी आमदार शिरीष चौधरी यांचे वडील होते.






