जळगाव मनपा निवडणूक : प्रभाग १३ च्या विकसित सौंदर्यासाठी एकच नाव ‘हर्षा उदय पवार’

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव महानगरपालिका निवडणुकीचे वातावरण तापले असून प्रभाग क्रमांक १३ मध्ये नारीशक्तीचा नवा चेहरा म्हणून सामाजिक कार्यकर्त्या हर्षा उदय पवार यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा रंगू लागली आहे. मोहाडी रोड परिसरातील नागरिक, महिला वर्ग आणि युवा मतदार हर्षा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. सामाजिक कार्यकर्त्या हर्षा पवार यांना उमेदवारी द्यावी, अशी नागरिकांची प्रबळ इच्छा आहे.
गेल्या बारा वर्षांपासून यशस्वीपणे “युडीज ब्यूटी पार्लर अँड सलून” चालवणाऱ्या हर्षा पवार या केवळ उद्योजिका नाहीत, तर समाजाशी घट्ट नातं जोडलेल्या एक संवेदनशील कार्यकर्त्या आहेत. आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी परिसरातील लाडक्या भगिनींमध्ये आत्मीयतेचे नाते निर्माण केले असून, महिलांसाठी त्या एक विश्वासार्ह नाव बनल्या आहेत. तसेच त्यांचे पती उदय पवार यांचा देखील दांडगा जनसंपर्क आहे.
पवार कुटुंबाचे समाजकार्यात मोलाचे योगदान
गेल्या काही वर्षात पवार कुटुंबाने २६ जानेवारी, १५ ऑगस्टनिमित्त भारत माता पूजन व वक्तृत्व स्पर्धा आयोजन, महिला भगिनींसाठी हळदीकुंकू सोहळा व विविध स्पर्धा, महिला दिनानिमित्त विशेष कार्यक्रम व सन्मान सोहळा, महापुरुषांच्या जयंती व पुण्यतिथी साजरे करणे, गणपती व नवरात्र उत्सवात उत्स्फूर्त सहभाग, दिवाळीत सफाई कर्मचाऱ्यांना फराळ व गिफ्ट वाटप, मोफत आरोग्य निदान शिबिर व होमिओपॅथी तपासणी कॅम्पचे आयोजन, दत्त जयंती व सप्ताह कार्यक्रमात सक्रिय सहभाग, नेहरूनगर, रायसोनी नगर, शंभर फुटी रोड, देवेंद्र नगर, राम-लक्ष्मण नगर, छत्रपती संभाजी नगर तसेच प्रभाग क्रमांक १३ मध्ये वेळोवेळी साफसफाई अभियान राबविणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत.
सर्व वयोगटातील मतदारांमध्ये लोकप्रिय नव्या पिढीचा चेहरा
हर्षा उदय पवार या प्रभाग क्रमांक १३ मधील नव्या, ऊर्जावान आणि जनसंपर्कात निपुण चेहरा म्हणून उदयास येत आहेत. नागरिकांना वाटते की, प्रभाग १३ मध्ये सकारात्मक बदल घडवायचा असेल, तर हर्षा पवारच योग्य पर्याय आहेत. त्यांच्या सातत्यपूर्ण कार्यामुळे आणि सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे त्या केवळ महिलाच नव्हे तर सर्व वयोगटातील मतदारांमध्ये लोकप्रिय होत आहेत. आगामी निवडणुकीत त्यांच्या उमेदवारीची औपचारिक घोषणा झाली, तर हा प्रभाग परिवर्तनाचा केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जनतेचा विश्वास, बदल आणि विकासाचे प्रतीक
“हर्षा पवार या केवळ उमेदवार नाहीत, तर परिसरातील प्रत्येक नागरिकाच्या विकासाच्या भावना प्रतिनिधित्व करणारे नाव आहेत,” असे मोहाडी रोड परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. हर्षा पवार यांच्या कार्याचा झळाळता ठसा आणि नागरिकांचा वाढता विश्वास पाहता, प्रभाग क्रमांक १३ मध्ये “बदल आणि विकासाचे प्रतीक हर्षा पवार!” अशी हाक आता जनतेच्या ओठांवर आहे.






