वंचित बहुजन आघाडीच्या जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी जाहीर; ईश्वर पंडीत पाटील जिल्हाध्यक्षपदी

जळगाव (राकेश वाणी): वंचित बहुजन आघाडी (VBA) तर्फे नुकतीच जळगाव जिल्हा पश्चिम कार्यकारिणी जाहीर करण्यात आली असून, यामध्ये ईश्वर पंडीत पाटील यांची जिल्हाध्यक्षपदी वर्णी लागली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सामाजिक, राजकीय आणि सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पाटील यांचा संघटनात्मक कामाचा दांडगा अनुभव
ईश्वर पंडीत पाटील यांचा संघटनात्मक कामाचा आणि दांडगा जनसंपर्क जळगाव ग्रामीण भागात आहे. मागील काळात त्यांनी विविध पदांवर काम केले आहे. ते जळगाव तालुका राष्ट्रवादी किसान सेलचे तालुकाध्यक्ष होते. यासोबतच, स्व. पंडितराव पाटील ऊसतोड कामगार संघटनेचे ते संस्थापक अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या या अनुभवामुळे आणि कार्याची दखल घेऊन, वंचित बहुजन आघाडीने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
महासचिव किसन चव्हाण यांनी सोपवली जिल्ह्याची जबाबदारी
ईश्वर पंडीत पाटील यांच्या पूर्वीच्या संघटनात्मक कार्याची नोंद घेत, पक्षाचे महासचिव किसन चव्हाण यांनी त्यांना जळगाव जिल्हा पश्चिमची जबाबदारी सोपवली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केला आहे.
सर्व स्तरांतून शुभेच्छांचा वर्षाव
जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यामुळे ईश्वर पंडीत पाटील यांना सामाजिक, राजकीय, तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छा देण्यात येत आहेत. या निवडीमुळे जळगाव जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.






