‘गणपती बाप्पा मोरया!’ च्या गजरात विवेकानंद प्रतिष्ठान स्कूलमध्ये गणेश विसर्जन

‘गणपती बाप्पा मोरया!’ च्या गजरात विवेकानंद प्रतिष्ठान स्कूलमध्ये गणेश विसर्जन
जळगाव: विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम आणि सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सात दिवसांच्या गणेशोत्सवानंतर २ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जन सोहळा उत्साहात पार पडला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!’ च्या गजरात शाळेच्या विद्यार्थ्यांनी बाप्पाला निरोप दिला.
गणेशोत्सवाची सांगता करण्यासाठी शाळेमध्ये सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले होते. शाळेचे प्राचार्य संतोष चौधरी आणि त्यांच्या पत्नी वर्षा चौधरी यांच्या हस्ते ही पूजा पार पडली. त्यानंतर, बाप्पा आपल्या गावी जाणार या विचाराने वातावरण उदास झाले होते.
ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना इको-फ्रेंडली गणपतीचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.
या सोहळ्याला शाळेचे प्रशासन अधिकारी दिनेश ठाकरे, सांस्कृतिक विभागाचे प्रमुख किरण सोहळे, माध्यमिक विभागाचे प्राचार्य संतोष चौधरी, प्राथमिक विभागाच्या प्राचार्या योगिता शिंपी, पूर्व प्राथमिक विभागाच्या प्राचार्या सविता कुलकर्णी आणि सेमी विभागाचे प्राचार्य हेमराज पाटील उपस्थित होते.
हा सोहळा यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम प्रमुख करिश्मा पाठक, माध्यमिक विभागाच्या सांस्कृतिक विभाग प्रमुख हर्षदा उपासनी यांनी सर्व विभागांच्या प्राचार्यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजन केले. तसेच, शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.






