मूळजी जेठा महविद्यालयात ‘चैतन्य २०२५’ अंतर्गत पारंपारिक वेशभूषा दिवस उत्साहात साजरा

मूळजी जेठा महविद्यालयात ‘चैतन्य २०२५’ अंतर्गत पारंपारिक वेशभूषा दिवस उत्साहात साजरा
जळगाव – के. सी. ई. सोसायटी संचलित मूळजी जेठा महविद्यालयात चैतन्य २०२५ स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने आज अत्यंत जल्लोषात पारंपारिक वेशभूषा दिवस साजरा करण्यात आला . सकाळपासून महाविद्यालयातील परिसर हा विद्यार्थ्यांच्या उत्साहाने भरला होता. विद्यार्थिनींनी विविध पारंपरिक, पैठणी, नऊवारी, सहावारी, राजस्थानी, आणि दक्षिण भारतीय साड्यांचा आणि विद्यार्थ्यांनी सुद्धा विविध प्रांतातील पेहराव करून लक्ष वेधले. तसेच काही विद्यार्थ्यांनी विविध ऐतिहासिक महापुरुषांचे, समाज सुधारकांची वेशभूषा केले होते. छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, झांसीची राणी अशा विविध पात्रांची वेशभूषा करून विद्यार्थ्यांनी वेशभूषा स्पर्धेत ही उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.