Crime

जळगावात ४ अवैध गॅस भरणा केंद्रावर एलसीबीची छापेमारी, लाखोंचा मुद्देमाल जप्त

महा पोलीस न्यूज । दि.२ जानेवारी २०२५ । जळगाव शहरातील अवैध गॅस भरणा केंद्राची दुर्घटना ताजी असताना पुन्हा अवैध गॅस भरणा केंद्र सुरू करण्यात आले आहेत. गॅस सिलेंडर साठवून वाहनांमध्ये भरत असताना आज जळगाव शहरातील पिंप्राळा भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली. पथकाने चार जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील पिंप्राळा परिसरात घरगुती गॅसच्या काळाबाजार स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना माहिती मिळाल्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक मोहिम राबवण्यात आली. त्यानुसार, वसीम चंगा शहा (वखार जवळ पिंप्राळा), अकलाख खान जहांगीर खान (खाजा नगर पिंप्राळा), फिरोज अलाउद्दीन शेख (पिंप्राळा हुडको) आणि जुबेर खान उस्मान खान पठाण (पिंप्राळा हुडको) या चौघांना घरगुती गॅसचा काळाबाजार करताना ताब्यात घेतले.

आरोपींना घरगुती गॅस सिलेंडरची साठवणूक करून ते वाहनांमध्ये भरत असल्याच्या आरोपावरून पकडण्यात आले. त्यांच्याकडून एकूण ११ घरगुती गॅस सिलेंडर, ५ मोटारी, गॅस भरण्याचे साधन आणि दोन वजन काटे जप्त करण्यात आले. जप्त मुद्देमालाची किंमत २ लाख १ हजार रुपये इतकी आहे.

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकाखाली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय पोटे, सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, रवी नरवाडे, राजेश मेढे, हरिलाल पाटील, मुरलीधर धनगर, प्रवीण भालेराव, रवींद्र कापडणे, पोलीस चालक भरत पाटील आणि रामानंद नगर पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या सहकार्याने करण्यात आली.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button