मोहाडी येथे शालेय साहित्य व भांडे किट वाटप कार्यक्रम

मोहाडी येथे शालेय साहित्य व भांडे किट वाटप कार्यक्रम
स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्या जयंतीनिमित्त लोकसेवेचा वारसा जपण्याचा उपक्रम
जळगाव प्रतिनिधी l
जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष स्वर्गीय भिलाभाऊ सोनवणे यांच्या जयंतीनिमित्त मोहाडी येथे सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व वह्यांचे वाटप करण्यात आले, तसेच बांधकाम कामगार लाभार्थ्यांना भांडे किटचे वितरण करण्यात आले. हे वितरण जिल्हा परिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माजी जि. प. सदस्य पवन सोनवणे यांनी स्व. भिलाभाऊ सोनवणे यांच्या जीवनकार्याचा आणि सामाजिक योगदानाचा आढावा घेतला. प्रताप पाटील यांनी आपल्या भाषणात सांगितले की, भिलाभाऊ सोनवणे हे केवळ पदांवर विराजमान नव्हते, तर त्यांच्या कार्यकर्तृत्वाने गावोगाव विकास घडविला आणि जनतेच्या मनात ठसा उमटवला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश बागुल यांनी केले, तर सरपंच धनंजय सोनवणे यांनी आभार मानले.
या वेळी ग्रामसेवक दिलीप पवार, मुख्याध्यापक भीमराव पवार, ग्रा. पं. सदस्य सजन राठोड, सुनील सोनवणे, विजय गवळी, अजय कोळी, भिका सोनवणे, मुकुंद पाटील, ज्ञानेश्वर ठाक, पुंडलिक सोनवणे, छगन राठोड, निंबा गवळी, माणिक गवळी, किरण गवळी, युवराज निरखे, सदाशिव महाले, आनंदा गवळी, रमेश कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.