Politics

‘टायगर अभी जिंदा है’ : एकनाथराव खडसेंच्या जाहिरातीची जोरदार चर्चा

महा पोलीस न्यूज । ६ जून २०२४ | नुकतेच लोकसभा निवडणुकीचा निकाल लागला असून यात जळगाव जिल्ह्यातील रावेर मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. मतदार संघात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याचे बोलले जात होते मात्र आता रक्षा खडसे यांच्या विजयानंतर सर्व मतदारसंघात मिळालेले मताधिक्य लक्षात घेता खडसेंचे वजन दिसून आले आहे. गुरुवारी जळगावच्या काही वर्तमानपत्रात एकनाथ खडसे यांच्यावर एक जाहिरात प्रसिद्ध झाली असून ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहीलेली ही जाहिराच पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

गेल्या काही दिवसांपासून एकनाथराव खडसे यांचा प्रभाव कमी झाल्याच्या विरोधकांकडून गप्पा केला जात होत्या. खडसेंनी भाजप सोडत राष्ट्रवादी काँग्रेसची वाट धरली आणि गेल्याच महिन्यात पुन्हा भाजपात जाणार असल्याचे जाहीर केले. खडसेंच्या भूमिकेनंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली मात्र त्या संयम राखला. रावेर लोकसभा मतदार संघात भाजपच्या उमेदवार रक्षा खडसे यांच्या प्रचारार्थ एकनाथराव खडसे मैदानात उतरले तर दुसरीकडे मुलगी रोहिणी खेवलकर विरोधात राहिल्या.

जाहिरातीने वेधले लक्ष
नुकतेच निकाल जाहीर झाले असून रक्षा खडसे यांनी दणदणीत विजय प्राप्त केला आहे. गुरुवारी जळगावच्या वर्तमानपत्रात एकनाथ खडसे मित्रपरिवार समर्थकांकडून एक जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. त्यात ‘टायगर अभी जिंदा है’ असा डायलॉग लिहिलेला आहेत. एवढंच नव्हे तर ‘ एहसास से मजबूर ना समझो गुलशन से बहुत दूर ना समझो मुझको, मै आज भी इतिहास बदल सकता हू इतना भी कमजोर ना समजो मुझको’ असेही या जाहिरातीमध्ये नमूद करण्यात आले आहे.

जाहिरातीतून लगावला टोमणा
एकनाथराव खडसे यांच्या मित्रपरिवार आणि समर्थकांकडून जाहिरात प्रकाशित करण्यात आली असून त्यातील शेरोशायरीवरून भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांना डिवचण्यात आल्याचा प्रयत्न केल्याची चर्चा जळगावात रंगली आहे. खडसे समर्थकांकडून जाहीरितच्या माध्यमातून विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button