Crime

पुन्हा पकडले दोन गावठी कट्टे, भुसावळ बाजारपेठ पोलिसांची कामगिरी

महा पोलीस न्यूज | २९ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यात सध्या गावठी कट्टे आणि चोरीच्या दुचाकी पकडण्यात पोलिसांना मोठे यश येत आहे. जिल्ह्यात सुरू असलेल्या वॉश आऊट मोहिमेत भुसावळ पोलिसांनी एका तरुणाला अटक केली असून त्याच्याकडून दोन गावठी बनावटीचे कट्टे, १ जिवंत काडतूस, महागडी दुचाकी व मोबाईल हस्तगत केला आहे.

भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजानन पडघन यांना गोपनीय बातमी मिळाली कि, भुसावळ शहरातील पांडुरंग टॉकीजच्या मागील दगडी पुलाजवळ एक इसम महागडी दुचाकी घेऊन त्याच्या कब्जात गावठी पिस्टल बाळगुन कोणता तरी गंभीर स्वरुपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. निरीक्षक पडघन यांनी लागलीच तपासकामी पथकाला रवाना केले. पथकाने संशयिताला ताब्यात घेतले असता त्याचे नाव, गाव विचारता त्याने नाव देवानंद विकास कोळी वय-२० वर्ष रा.तुकाराम नगर, पाडळसा ता.यावल असे सांगितले.

पथकाने संशयिताची पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कमरेस आणि जवळ दोन गावठी बनावटीचे कट्टे व एक जिवंत काडतूस मिळून आला. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनला भारतीय शस्त्र कायद्यानुसार निलेश चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादवरुन गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी कृष्णात पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजानन पडघन, उपनिरीक्षक राजु सांगळे, पोलीस नाईक निलेश चौधरी, प्रशांत परदेशी, प्रशांत सोनार यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button