Detection

अट्टल दुचाकी चोरटे एलसीबीच्या जाळ्यात, १० दुचाकी हस्तगत

महा पोलीस न्यूज । दि.२२ सप्टेंबर २०२४ । जळगाव जिल्ह्यात सध्या जास्त प्रमाणात मोटारसायकल चोरीचे प्रमाणे वाढले असल्याने आरोपीतांचा शोध घेवून त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीला दिले होते. एलसीबीच्या पथकाने गुप्त माहिती काढून दुचाकी चोरट्यांची गँग पकडली आहे. चोरट्यांकडून जळगावात चोरलेल्या १० दुचाकी हस्तगत करण्यात आल्या.

एलसीबीच्या पथकातील हवालदार विनोद पाटील यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, टाकरखेडा ता.जामनेर येथील विशोल गोपाल भोई हा चोरीची मोटारसायकल घेवून फिरत आहे, खात्रीशीर बातमी मिळाल्याने पथक हे बरेच दिवसापासून त्यांचे मागावर होते परंतु तो पोलीसांची नजर चुकवून त्याची ओळख लपवून वावरत होता. पथकातील अंमलदार यांनी सुरेश पाडवी हा त्याचे गावी टाकरखेडा येथे असल्याची माहिती मिळाल्याने त्यास टाकरखेडा येथून सापळा रचत ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्यास विश्वासात घेवून विचारपुस केली असता त्याने त्याचे दोन साथीदार देवानंद उर्फ आनंद भोजरंग सुरडकर, सुरज अशोक पारधी (सांळुखे), रा.टाकरखेडा ता.जामनेर यांची नावे सांगितली. पथकाने यांना देखील ताब्यात घेतले आहे. तिघांकडून ४ लाख ३३ हजाराच्या १० मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहे. सर्व दुचाकी जळगाव शहरातून चोरलेल्या आहेत. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे,

पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, दत्तात्रय पोटे, हवालदार गजानन देशमुख, विनोद पाटील, महेश महाजन, विष्णु बिऱ्हाडे, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, राहुल महाजन यांच्या पथकाने पार पाडली आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button