उमरखेड येथे चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक

उमरखेड येथे चारचाकी वाहनातून दारूची अवैध वाहतूक
एक लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त, उमरखेड पोलिसांची कारवाई
यवतमाळ प्रतिनिधी
एका चार चाकी वाहनांमधून देशी दारूची अवैध वाहतूक करणारे वाहन उमरखेड पोलिसांनी पकडले असून वाहन चालकाला वाहनासह एक लाख 60 हजार च्या मुद्देमाल सह अटक करण्यात केल्याची कारवाई मंगळवारी करण्यात आली.वैभव मुंजाजी हिंगडे (२०) रा.चातारी ता उमरखेड असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
उमरखेड पोलिसांचे पथक गस्तीवर असतांना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, चातारी बिट परिसरात एक इसम एमएच ३५ एम ३०६ या टाटा सुमो क्रमांकाच्या वाहनातून देशी दारुची अवैध वाहतूक करीत आहे. या माहितीवरून पोलीस पथकाने तत्काळ खासगी वाहनाने
घटनास्थळ गाठून सापळा रचला. यावेळी संबधीत क्रमांकाच्या वाहनाला थांबवून त्यांची चौकशी केली. तसेच वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये देशी विदेशी दारुसाठ्याचे मोठ्या प्रमाणात बॉक्स आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी पंचासमक्ष पंचनामा करून ६० हजार ४८० रुपयाचा दारुसाठा व एक लाख रुपये किमतीचे वाहन असा एकूण १ लाख ६० हजार ४८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. तसेच आरोपीविरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंद करून त्याला अटक करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पीयूष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग उमरखेड हनुमंत गायकवाड, पोलीस निरीक्षक शंकर पांचाळ यांच्या मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक सारीका नि. राऊत, गरजप्पा मुसळे, आकाश यांनी केली.