
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे देशभरातील अनेक भाविक त्याठिकाणी अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. जळगाव जिल्ह्यातील १९ भाविक अडकल्याची माहिती समोर येत असून त्यात जळगाव शहरातील तीन भाविक सुरक्षित असल्याची पुष्टी झाली असल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्तराखंड येथे झालेल्या ढगफुटीमुळे एक गाव वाहून गेले असून इतर ठिकाणी देखील काही भाविक अडकले आहेत. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथील २, पाळधी येथील १३, पाचोरा येथील १ जवान आणि जळगाव शहरातील ३ असे १९ भाविक अडकल्याची माहिती आहे.
उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेल्या जळगावातील भाविकांसंदर्भात जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार उत्तरकाशी येथील स्टे हाऊसशी जिल्हा नियंत्रण कक्षाने संपर्क केला असता मेहरा कुटुंबातील अनामिका मेहरा, आरोही मेहरा, रुपेश मेहरा हे उत्तर काशी दुर्घटनेत अडकलेले भाविक अयोध्या नगर जळगाव येथील असून सर्व तीनही भाविक सुखरूप असून नेटवर्क नसल्याने संपर्क होऊ शकला नाही. भाविकांचे वडील चंद्रशेखर नरवरिया जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्षात आले असता त्यांचा उपरोक्त स्टे हाऊस मालकाशी संपर्क करून दिला आहे.
दरम्यान, पाचोरा येथील जवान सोपान अहिरे हा देखील त्याठिकाणी अडकला असल्याची माहिती आहे. सर्व भाविकांच्या नातेवाईकांशी आणि भाविकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू असून सर्व भाविक सुखरूप असल्याची माहिती घेतली जाईल असे जिल्हाधिकारी डॉ.आयुष प्रसाद यांनी सांगितले.
पहा संपूर्ण व्हिडिओ :