कर्की येथे श्रमदानातून विद्यार्थ्यांनी बांधला वनराई बंधारा

केशवस्मृती प्रतिष्ठान आणि संत मुक्ताबाई महाविद्यालय यांचा उपक्रम
मुक्ताईनगर I प्रतिनिधी तालुक्यातील कर्की गावात संत मुक्ताबाई कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मुक्ताईनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) च्या विद्यार्थ्यांनी वनराई बंधारा बांधला आहे. वनराई बंधारा कार्यक्रम समग्र कृषि ग्रामीण विकास प्रकल्पाच्या अंतर्गत जिल्हयाभर राबविण्यात येत आहे . ;श्रमदानातून जलसंधारणया उद्दिष्टावर लक्ष केंद्रित करून जलसंधारणाच्या महत्वावर जागरूकता निर्माण करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे
. या वनराई बंधारा प्रकल्पाची अंमलबजावणी केशवस्मृती प्रतिष्ठान संचालित समग्र कृषि ग्रामीण विकास प्रकल्पाचे प्रमुख व निवृत्त प्रकल्प संचालक आत्मा अनिल भोकरे आणि जलनायक शिवाजीराव भोईटे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकल्पाच्या श्रमदानाकरिता ७० विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांना वनराई बंधारा बांधण्याच्या कार्य प्रक्रियेची माहिती बाबत आदित्य सावळे (प्रकल्प व्यवस्थापक, समग्र कृषि ग्रामीण विकास प्रकल्प) यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
हा बंधारा कर्की येथे लेंढी नाल्यावर, आशोक कडू पाटील यांच्या शेतात बांधला गेला विद्यार्थ्यांनी लेंढी नाल्याच्या किनाऱ्यावर बंधारा बांधण्याचे कार्य सुरु केले. तेथे विद्यार्थ्यांनी रिकाम्या बॅग्स भरून तांत्रिक पद्धतीने बंधारा बांधण्याची प्रक्रिया पूर्ण केली. कार्यक्रमाच्या तांत्रिक मार्गदर्शनासाठी आदित्य सावळे यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली या कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जलसंधारणाच्या महत्वाबद्दलची जागरूकता मिळाली आणि त्यांचे शारीरिक श्रम करून पर्यावरण संवर्धनासाठी योगदान देण्याचा संकल्प दृढ झाला.
या कार्यक्रमाकरिता समग्र कृषि ग्रामीण विकास प्रकल्प चे प्रकल्प सहायक राजन इंगळे राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. संदीप माळी, प्रा. डॉ. व्ही. एस. लव्हाळे , आणि प्रा. डॉ. पी. एस. देशमुख आणि ग्रामस्थ उपस्थित होते वनराई बंधारा जलसंधारणाचा एक महत्त्वाचा भाग आहे, जो पाणी शिल्लक ठेवण्यासाठी आणि पाणीपातळी सुधारण्यासाठी कार्य करतो. अशा प्रकारच्या उपक्रमांचा समाजावर दीर्घकालीन सकारात्मक परिणाम होईल.