आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कर अय्युब ऊर्फ अलीला मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरून अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3.13 लाखांचे MD ड्रग्ज जप्त

आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कर अय्युब ऊर्फ अलीला मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरून अटक
स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; 3.13 लाखांचे MD ड्रग्ज जप्त
यवतमाळ प्रतिनिधी
यवतमाळ जिल्हा पोलिसांनी अंमली पदार्थविरोधी मोहिमेत आणखी एक मोठे यश मिळवले आहे. मध्यप्रदेश-राजस्थान सीमेवरील भावगढ येथून आंतरराज्यीय ड्रग्ज तस्कर अव्युब ऊर्फ अली खान (वय 40, रा. बोरखेडा, ता. पिपलोदा, जि. रतलाम, मध्यप्रदेश; ह. मु. भावगढ, जि. मंदसौर) याला स्थानिक गुन्हे शाखेने सापळा रचून अटक केली. त्याच्याकडून 62.61 ग्रॅम MD (Mephedrone) नावाचा अंमली पदार्थ जप्त करण्यात आला असून, याची किंमत 3,13,050 रुपये आहे. ही कारवाई 6 एप्रिल 2025 रोजी रात्री करण्यात आली.
अटकेनंतर अली खानला 7 एप्रिल रोजी न्यायालयात हजर केले असता, त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.मोहिमेचा भागपोलीस अधीक्षक कुमार चिता यांच्या नेतृत्वाखाली यवतमाळ जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम सुरू आहे. यापूर्वी 28 मार्च 2025 रोजी कळंब येथे नोंद झालेल्या गुन्ह्यात (अप. क्र. 207/2025, कलम 8(क), 21(क), 29 NDPS अॅक्ट) नागपूर येथील अभय राजेंद्र गुप्ता (वय 30, रा. बुटीबोरी) आणि इस्तियाक हुसेन ऊर्फ इस्तियाक खातीब (वय 45, रा. बडा ताजबाग, निर्मल नगरी टाऊनशिप) याला अटक करण्यात आली होती त्याच्याकडूनही अंमली पदार्थ आणि रोख रक्कम जप्त झाली होती. या तपासातूनच अली खानचे नाव समोर आले.
पोलीस अधीक्षकांनी ड्रग्ज तस्करीचे संपूर्ण जाळे उध्वस्त करण्याचे आदेश दिल्यानंतर विशेष पथकाने अटक आरोपींची कौशल्यपूर्ण चौकशी केली. तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने अंमली पदार्थांचा पुरवठा मध्यप्रदेशातून होत असल्याचे उघड झाले.
पथकाने मध्यप्रदेशात जाऊन तपास केला असता, अली खान हा भावगढ येथे असल्याची खबर मिळाली. रात्रीच्या वेळी सापळा रचून त्याला शिताफीने ताब्यात घेण्यात आले.महत्त्वाची कामगिरीपहिली घटना: राजस्थान-मध्यप्रदेशात जाऊन अंमली पदार्थ तस्कराला ड्रग्जसह अटक करण्याची ही यवतमाळ पोलिसांची पहिलीच कारवाई आहे.कुप्रसिद्ध ठिकाण: मंदसौर (मध्यप्रदेश) आणि प्रतापगड (राजस्थान) ही ठिकाणे देशभरात अंमली पदार्थ तस्करीसाठी बदनाम आहेत. अशा ठिकाणी जाऊन आरोपीला अटक करणे आणि 3.13 लाखांचा मुद्देमाल जप्त करणे हे पोलिसांचे मोठे यश मानले जात आहे.
: या कारवाईमुळे राजस्थान-मध्यप्रदेशापासून विदर्भातील तालुका स्तरापर्यंत पसरलेले अंमली पदार्थांचे जाळे उध्वस्त झाले आहे.पुढील तपासअली खानची चौकशी सुरू असून, त्याच्या ड्रग्ज पुरवठा साखळीचा आणखी तपास केला जाणार आहे. ही कारवाई यवतमाळ पोलिसांच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेतील महत्त्वाचा टप्पा ठरली आहेत.