OtherSocial

पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन

मुंबई वृत्तसंस्था -प्रसिद्ध तबलावादक पद्मविभूषण झाकीर हुसेन यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. अमेरिकेतील रुग्णालयात झाकीर हुसैन यांच्यावर उपचार सुरु होते. झाकीर हुसैन यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यासाठी त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण अखेरीस त्यांची झुंज अपयशी ठरली आणि झाकीर हुसैन यांची प्राणज्योत मालवली.        

-तबलावादनाच्या क्षेत्रात जागतिक पातळीवर भारताचे नाव उज्ज्वल करणारे, पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण पुरस्कारांनी सन्मानित तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण संगीत विश्वावर शोककळा पसरली आहे.

9 मार्च 1951 रोजी मुंबईत (त्यावेळचे बॉम्बे) जन्मलेल्या झाकीर हुसेन यांना संगीताची आवड त्यांच्या वडिलांकडूनच मिळाली. त्यांचे वडील उस्ताद अल्लारक्खा खान हेही एक महान तबलावादक होते. झाकीर हुसेन यांनी वयाच्या सातव्या वर्षीच संगीत क्षेत्रात पदार्पण केले आणि संगीत मैफलींमध्ये तबला वादन सुरू केले. त्यांनी आपले शिक्षण मुंबईतील सेंट झेवियर्स कॉलेजमधून पूर्ण केले तर पुढे वॉशिंग्टन विद्यापीठातून संगीत विषयात डॉक्टरेट मिळवली.

झाकीर हुसेन यांनी 1991 मध्ये प्रसिद्ध ड्रमर मिकी हार्ट यांच्यासोबत प्लॅनेट ड्रम या प्रकल्पात काम केले, ज्यासाठी त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळाला. त्यांनी अनेक चित्रपटांच्या संगीतासाठीही योगदान दिले. 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

1996 मध्ये अटलांटा येथे झालेल्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात संगीत तयार करणाऱ्या टीमचा ते भाग होते. 2016 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून ते व्हाइट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय संगीतकार ठरले.

योगदान दिले. 1991 मध्ये त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.

1996 मध्ये अटलांटा येथे झालेल्या ग्रीष्मकालीन ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यात संगीत तयार करणाऱ्या टीमचा ते भाग होते. 2016 मध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या निमंत्रणावरून ते व्हाइट हाऊसमध्ये ऑल-स्टार ग्लोबल कॉन्सर्ट मध्ये सहभागी होणारे पहिले भारतीय संगीतकार ठरले.

उस्ताद झाकीर हुसेन यांना 1988 मध्ये भारत सरकारकडून पद्मश्री, 2002 मध्ये पद्मभूषण, आणि 2023 मध्ये पद्मविभूषण या मानाच्या पुरस्कारांनी गौरविण्यात आले होते.

त्यांच्या निधनाने भारतीय संगीत क्षेत्रात एक अपूरणीय पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या आठवणी आणि संगीतामुळे ते नेहमीच अमर राहतील.

 

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button