
जळगाव : जिल्ह्यात एक जानेवारी ते 31 मे या कालावधीमध्ये शिक्षकांची भरती प्रक्रिया राबविण्यात येणार असून जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदलीची प्रक्रिया आता ऑनलाईन राबविण्यात येणार आहे. शासनाच्या शिक्षण विभागाचे कार्यासन अधिकारी नितीन पवार यांनी राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्रक काढून वेळापत्रक निश्चित करून दिले आहे.
शासन निर्णयाप्रमाणे १ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२५ शिक्षकांच्या याद्या प्रसिध्द करण्यात येणार आहेत. तसेच बदली पात्र शिक्षक, बदली अधिकार प्राप्त शिक्षक याद्या तयार करण्यात येणार आहेतत्याअनुषंगाने प्राप्त आक्षेपावर निर्णय घेण्यात येणार आहे
जिल्ह्यात १८ जून २०२४ रोजी शासनाच्या निर्णयानुसार जि.प. शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत बदल्यांसाठीचे सुधारीत धोरण निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार ही प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलव्दारे राबविण्यात येणार आहे.
समानीकरणांतर्गत रिक्त पदे व बदलीसाठी उपलब्ध रिक्त पदे याबाबतची माहिती जिल्हा परिषदेने १ ते ३१ मार्चपर्यंत निश्चित करावी लागणार आहे. १ ते २० एप्रिल या काळात बदलीसाठी आवश्यक डाटा जिल्हा परिषदेने तयार करून डाटा विन्सीस कंपनीला उपलब्ध करून द्यायचा आहे.
जिल्हाभरात ७ टण्यात ३१ मे पर्यंत ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. बदली प्रक्रियेत समाविष्ठ शिक्षकांचे वैयक्तीक प्रोफाईल तयार करणे, अद्यावत करणे, त्यात दुरूस्ती करणे याबाबतची कार्यवाही २८ फेब्रुवारी पर्यंत अंतिम करावी लागणार आहे. बदली प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शिक्षकांच्या वैयक्तीक प्रोफाईलमध्ये कोणतीही दुरूस्ती करता येणार नसल्याचे शिक्षण विभागाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.